29 April 2024 6:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

नजीकच्या काळात पूर्वीसारखी सामान्य स्थिती होणे अत्यंत कठीण - WHO'चं भाकीत

World Health Organization, Tedros Adhanom Ghebreyesus, Coronavirus pandemic

वॉशिंग्टन, १४ जुलै : जगात अमेरिका हा देश कोरोना संकटाचा सर्वात मोठा बळी ठरला आहे. अमेरिकेत गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे 70 हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोणत्या देशात 24 तासात झालेली ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत 31,83,856 लोकं कोरोनाग्रस्त झाले आहेत.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सध्या जगभरात १ कोटी ३२ लाख लोकांना करोनाची लागण झालेली आहे. तर मृतांची संख्या साडे पाच लाखांच्या पुढे गेली आहे. टेड्रोस यांनी यावेळी रविवारी २ लाख ३० हजार नवे रुग्ण मिळाले असून यामधील ८० टक्के रुग्ण १० देशांमधील असून फक्त दोन देशांमध्ये ५० टक्के रुग्ण मिळाले असल्याचं सांगितलं. अमेरिका आणि ब्राझिलला करोनाचा सर्वात जास्त फटका बसलेला आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रोस अ‍धॅनम घेब्रेयेसस यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या संकटाची परिस्थिती आणखी धोकादायक बनत चालल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

ते म्हणाले की, आता काही काळापर्यंत पूर्वीसारखेच आयुष्य सामान्य होणार नाही. सोमवारी पत्रकार परिषदेत घेब्रेयेसस बोलत होते. ते म्हणाले, “नजीकच्या काळात पूर्वीसारखे दिवस आणि स्थिती सामान्य होणे कठीण आहे”. अनेक देश या साथीला रोखण्याचा प्रयत्न करत असून, अनेक देशांनी त्यावर नियंत्रणही मिळवण्याचं चित्र आहे. त्याच वेळी युरोप आणि आशियामधील अनेक देश चुकीच्या दिशेने जात आहेत. या दोन्ही खंडांत दिवसेंदिवस परिस्थिती भयानक होत चालली आहे. जगातील काही नेत्यांचे नाव न घेता ते म्हणाले की, काही लोक याकडे गांभीर्यानं पाहत नाहीत, परंतु साथीच्या रोगाचं संकट किती धोकादायक आहे, याची त्यांना कल्पना नाही. अमेरिकेतील दक्षिण आणि पश्चिमेकडच्या राज्यांमध्ये मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे.

 

News English Summary: The head of the World Health Organization (WHO), Tedros Adhanum Ghebreyesus, has warned of the danger. He said the Corona crisis was becoming more dangerous.

News English Title: Who director general tedros adhanom ghebreyesus says coronavirus pandemic is going to get worse News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x