28 March 2024 4:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या
x

Meta Smartwatch Coming Soon | ॲपलला टक्कर देण्यासाठी 'मेटा स्मार्टवॉच' लाँच होणार

Meta Smartwatch Coming Soon

मुंबई, 29 ऑक्टोबर | फेसबुकने नुकतेच आपल्या कंपनीचे ‘मेटा‘ असे नवीन नाव जाहीर केले आहे. त्यानंतर मेटा लवकरच आपले पहिले स्मार्टवॉच लॉन्च करू शकते असा दावा करत अनेक रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यासोबतच अनेक फोटोही लीक झाले आहेत. यामध्ये ते स्मार्टवॉच असेल यात शंका नाही असं म्हटलं जातंय. पण स्मार्टवॉच लॉन्च करण्याबाबत (Meta Smartwatch Coming Soon) कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

Meta Smartwatch Coming Soon. Facebook has recently announced the new name of its platform. Since then, several reports have surfaced, claiming that Meta may soon launch its first smartwatch. Along with this, many photos have also been leaked :

ब्लूमबर्गच्या अहवालात असे म्हटले आहे की मेटाचे आगामी स्मार्टवॉच रे-बॅन ग्लास अॅपमध्ये दिसले आहे. मात्र, यावरून स्मार्टवॉचच्या वैशिष्ट्यांची माहिती मिळालेली नाही. रे-बॅन स्मार्ट ग्लास अनेक महिन्यांपूर्वी लॉन्च करण्यात आला आहे. यात अंगभूत कॅमेरे आहेत, ज्याद्वारे व्हिडिओ रेकॉर्ड केला जाऊ शकतो.

लीक झालेला फोटो पाहता, मेटाच्‍या स्‍मार्टवॉचमध्‍ये गोलाकार कोपरा असलेला चौकोनी डायल आहे, ज्याचा लूक Apple वॉच सारखा आहे. डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर यात नॉच स्क्रीन आहे. अशा स्थितीत कॅमेरा घड्याळात असेल असे म्हणता येईल. याशिवाय स्पोर्ट्स मोड आणि कॉल-मेसेज नोटिफिकेशन्ससह हार्ट-रेट, ब्लड ऑक्सिजन आणि स्लीप ट्रॅकर ही वैशिष्ट्ये स्मार्टवॉचमध्ये दिली जाऊ शकतात. हे घड्याळ अँड्रॉईड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल.

स्मार्टवॉच 2022 मध्ये लॉन्च होऊ शकते:
रिपोर्टनुसार, मेटा 2022 च्या सुरुवातीला आपले पहिले स्मार्टवॉच लॉन्च करू शकते. मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लॉन्चबाबत कोणतेही अधिकृत संकेत दिलेले नाहीत. कनेक्ट कॉन्फरन्स दरम्यान, मार्क झुकरबर्गने 2022 मध्ये लॉन्च होणार्‍या हार्डवेअरबद्दल सांगितले. अशा परिस्थितीत मेटा स्मार्टवॉच जागतिक स्तरावर प्रथम लॉन्च केला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. हे स्मार्टवॉच इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये अॅपलच्या वॉचला टक्कर देईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Meta Smartwatch Coming Soon to compete with Apple.

हॅशटॅग्स

#gadgets(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x