19 April 2024 12:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

शेतकऱ्यांवरील लाठीहल्ला; यूपीच्या त्या गावात भाजपला बंदी, थेट फलक लावून इशारा

अमरोहा : भाजपच्या नेत्यांना आणि पक्षाला उत्तर प्रदेशातील धनौरा तालुक्यातील रसूलपूरच्या गावकऱ्यांनी गावाच्या सीमेवर थेट फलक लावून भाजपच्या नेत्यांना इशारा दिला आहे. शिवाय गावात भाजपचे नेते आणि कार्यकर्ते फिरकू नये म्हणून पहारा सुद्धा देण्यात येत आहे. “जर आमच्या गावात भाजप नेते मतं मागण्यासाठी आले, तर ज्याप्रकारे दिल्लीच्या सीमेवर आम्हा शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला, त्याचप्रकारे भाजप नेत्यांचं आमच्या गावात स्वागत केले जाईल” अशा कडक शब्दात हा इशारा देण्यात आला आहे.

जर भाजपचे नेते मंडळी आमच्या गावात आले तर स्वतःच्या जीवाचं रक्षण त्यांनी स्वतःच करावं असा दम त्यांना या फलकाद्वारे देण्यात आला आहे. या गावात जवळपास १००० मतदार आहेत आणि आमच्या गावातून भाजपला आगामी निवडणुत एकही मत दिलं जाणार नाही असा निर्धार या गावातील लोकांनी केला आहे. शेतकऱ्यांवरील लाठी हल्ल्यानंतर भाजप विरोधात या गावात खूप रोष पसरला आहे आणि तो इतर आसपासच्या गावात सुद्धा पसरण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे.

हा फलक समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागल्याने आसपासच्या गावातील लोकं सुद्धा तिथे जमू लागल्याचे चित्र सध्या गावात आहे. त्यामुळे तो भाजपविरोधी तिरस्कार सजून आसपासच्या गावात पसरण्याची शक्यता आहे. एकूणच काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला दिल्लीच्या सीमेवर अडवून, त्यांच्यावर प्रचंड लाठीहल्ला करण्यात आला होता आणि त्यामुळेच उत्तर भारतात भाजप प्रति रोष पसरू लागला आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x