28 March 2024 6:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

गोव्यात भाजप काँग्रेसचे आमदार फोडून 'काँग्रेस मुक्त गोवा' नारा देणार?

पणजी : गोव्यात सध्या राजकीय घडामोडींना जोर आला आहे. विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती सध्या स्थिर आहे; पण त्यांचा आजार गंभीर असल्याने भाजप तसेच सत्ताधारी मित्र पक्षांकडून मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली वेगाने वाढल्या आहेत. लवकरात लवकर पर्यायी नेतृत्वाचा शोध पूर्ण करून नव्या मुख्यमंत्र्यांकडे सूत्र सोपविण्याची जय्यत तयारी सुरु आहे.

गोव्यात नव्या मुख्यमंत्र्यांचा शोध सुरु असताना विश्वजीत राणे हे शर्यतीत आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आमदार फोडाफोडीला सुद्धा गोवा भाजप कडून सुरुवात झाली असून, कॉंग्रेसचे २ आमदार रसुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे हे दिल्लीत दाखल झाले असून आज राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांची यांची भेट घेऊन भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. त्यांना मंत्रिपदाची गाजर दाखविण्यात आल्याचे वृत्त आहे. भाजपचे विद्यमान आरोग्यमंत्री विश्वजीत राणेही सुद्धा दिल्लीला रवाना झाले असून गोव्यातील भाजप व मित्रपक्षांशी अमित शहा सविस्तर चर्चा करणार आहेत.

गोव्याला नव्या मुख्यमंत्र्यांची तातडीने गरज आहे याची कल्पना गोवा फॉरवर्ड पक्ष आणि मगोप यांना सुद्धा आली आहे. सरकारमधील ३ विद्यमान मंत्री १७ किंवा १८ ऑक्टोबर रोजी दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांना भेटून राज्यातील पूर्ण राजकीय स्थिती त्यांच्यासमोर मांडतील असं वृत्त आहे.मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आघाडीवर असले तरी मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांची त्यांना अजून मंजुरी नाही. तसेच गोवा फॉरवर्डचे नेते मंत्री विजय सरदेसाई यांचा राणे यांना जाहीर पाठिंबा आहे. गोवा भाजप आमदारांच्या आजच्या बैठकीत राजकीय स्थिती विषयी सविस्तर चर्चा झाली आणि त्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x