19 April 2024 8:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे भाव खाली

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होत असल्याने देशांतर्गत तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात केली आहे. मागील सलग १५ दिवसात कच्च्या तेलाचे दरात ६ डॉलर प्रति बॅरलने खाली आले आहेत. त्यामुळे भारतात सुद्धा इंधनाच्या दारात अल्पशी दर कपात होत आहे.

देशात आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल तसेच डिझेलचे दर खाली आले आहेत. मागील ४ दिवसात पेट्रोलच्या दरात प्रति लिटरमागे १.०९ रुपये आणि डिझेल प्रति लिटर ५० पैशाने स्वस्त झाले आहे.

राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचे दर प्रति लिटरमागे २५ पैशाने तर डिझेलचे दर प्रति लिटरमागे १७ पैशाने स्वस्त झाले आहेत. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ८१.७४ रुपये आणि ७५.१९ रुपये इतका झाले आहे. तर मुंबई शहरात पेट्रोल प्रति लिटरमागे २५ पैशाने आणि डिझेल प्रति लिटरमागे १८ पैशांनी स्वस्त झाले आहेत. त्यानुसार मुंबईतील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ८७.२१ रुपये आणि ७८.८२ रुपये एवढे झाले आहेत.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x