26 April 2024 4:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

अमित शहा आणि मोहन भागवत यांच्यात भेट, राम मंदिरावर चर्चा?

मुंबई : आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद आदी महत्वाच्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्याकरिता मोदी सरकारवर दबाव आणला असतानाच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी सरसंघचालक मोहन भागवत यांची मुंबईत भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केल्याचे वृत्त आहे. या बैठकीत राम मंदिर तसेच शबरीमला मंदिर अशा मुद्यावर बराचवेळ चर्चा झाल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणाची सुनावणी जानेवारी पर्यंत पुढे ढकलली आहे. त्यानंतरच अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या मुद्यावर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेनं राम मंदिर उभारणीसाठी थेट अध्यादेश लागू करण्याची मागणी मोदी सरकारकडे केल्याचे समजते. तसेच अयोध्येतील विवादित जागेवर राम मंदिर उभारणीसाठी मोदी सरकारनं थेट कायदा करावा, असं सरसंघचालकांनी काही दिवसांपूर्वीच जाहीरपणे म्हटलं होतं.

याच विषयाला अनुसरून भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येतं आहे. अमित शहा आणि मोहन भागवत या दोघांमध्ये जवळपास तासभर बंद दरवाजाआड चर्चा झाल्याचे वृत्त आहे. या चर्चेत मुख्य म्हणजे राम मंदिर आणि शबरीमला मंदिर मुद्यावर चर्चा झाल्याचं समोर येत आहे.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x