28 March 2024 2:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या Zomato Share Price | झोमॅटो शेअरने ब्रेकआऊट दिला, अल्पावधीत मोठी कमाई होणार, पुढील टार्गेट प्राइस जाणून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करणारा 42 रुपयाचा शेअर! 1 वर्षात 2400% परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर? IRFC Vs RVNL Share | या शेअरने 1 वर्षात दिला 297% परतावा, आता कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉकवर परिणाम होणार? Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअरवर परिणाम होणार? तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Bank of Maharashtra | पैशाचा पाऊस! बँक ऑफ महाराष्ट्र शेअर आज 4.48 टक्के वाढला, लवकरच 77 रुपयांवर जाणार
x

सेना नेत्यांवर योगी इफेक्ट? मलबार हिलचे नाव 'रामनगरी' करण्याची मागणी

मुंबई : सध्या देशभर शहर आणि विविध स्थानकांचे नामकरण करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. मूळ पायाभूत सुविधा दुर्लक्षित करून लोकांना धार्मिक नामकरणाच्या आडून मूर्ख बनवण्याचे उद्योग सुरु आहेत. यात सर्वाधिक विक्रम उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहेत. त्याचा परिणाम आता सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांवर सुद्धा झाल्याचे समजते.

कारण मुंबईतील मलबार हिल या उच्चभ्रू लोकवस्ती नामकरण बदलून ते ‘रामनगरी’ असे करण्याची मागणी थेट ठरावाच्या सूचनेद्वारे महापालिकेच्या महासभेपुढे करण्यात आल्याचे वृत्त आहे. काही महिन्यांपूर्वी स्थायी समितीतील पद आणि आमदारकीचं लक्ष समोर ठेऊन मनसेतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुधार समितीचे अध्यक्षपद मिळवणारे दिलीप लांडे यांनी ही मागणी मुंबई महानगर पालिकेत केल्याचे वृत्त आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार मलबार हिल हे नाव ब्रिटिश काळापासूनचे आहे. मात्र मलबार हिल भाग मुळात खूप प्राचीन असून येथे सीतामातेच्या शोधात निघालेले प्रभू रामचंद्र आणि त्यांचे बंधू लक्ष्मण यांनाही या भागात काही काळ वास्तव्य केल्याचे बोलले जाते. त्यामुळे विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मलबार हिलचे नाव बदलून आता ‘रामनगरी’ करावे, अशी थेट मागणी लांडे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

दरम्यान, सध्या मलबार हिलच्या नामकरणाची मागणी केवळ प्रस्ताव स्वरूपात पुढे करण्यात आली आहे. त्यानंतर सदर ठरावाची सूचना मुंबई महापालिकेच्या महासभेत अधिकृतरीत्या मंजूर करण्यात येईल. शेवटी तो मंजूर झाल्यानंतर महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांच्याकडे अभिप्रायासाठी तो पाठविण्यात येणार आहे असे वृत्त प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहेत.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x