20 April 2024 9:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

ऐन ख्रिसमसमध्ये अमेरिकेत 'शटडाऊन; सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले

वॉशिंग्टन डीसी: अमेरिका आणि मेक्सिको दरम्यानच्या सीमेवर भिंत उभारण्यासाठी ५ अब्ज अमेरिकी डॉलर मंजूर व्हावेत, ही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी अमेरिकी काँग्रेसमध्ये नामंजूर करण्यात आल्याने अमेरिकेच्या कारभाराला सरकारी कामकाजाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.

परंतु, ताळेबंदीची व्याप्ती प्रचंड मोठी नसली तरी ऐन ख्रिसमसच्या हंगामात महत्त्वाच्या अशा एकूण ९ अमेरिकन सरकारच्या खात्यांच्या कामांवर मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागणीवर अमेरिकी काँग्रेसमध्ये शुक्रवारी रात्रभर खलबतं सुरू होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या मागणीला डेमोक्रॅटिक सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने त्याबाबतचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे.

त्यामुळे शनिवारी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून तांत्रिक अर्थाने अमेरिकेतील ९ प्रशासकीय खात्यांचे ताळेबंदी सुरू झाले. २०१८ मधील अमेरिकेतील हा तिसरा शटडाऊन आहे. या शटडाऊनमुळे अमेरिकेतील सुमारे ८,००,००० सरकारी कर्मचाऱ्यांपुढे मोठा पेच उभा राहिला आहे. त्यांना या शटडाऊनच्या काळासाठी विनावेतन काम करावे लागण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे ऐन नाताळाच्या हंमागात ही परिस्थिती उत्भवल्याने त्यांच्यात प्रचंड असंतोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x