29 March 2024 5:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार?
x

उद्धव ठाकरेंच्या टीकेला योग्य वेळी उत्तर देणार: मुख्यमंत्री

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर बोचरी टीका केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रसार माध्यमांनी या टीकेला अनुसरून प्रश्न विचारला असता, उद्धव ठाकरेंच्या त्या टीकेला आम्ही योग्य वेळ आल्यावर योग्य पद्धतीने प्रतिउत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे एका पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रश्नाला अनुसरून फडणवीस यांनी मोजक्या शब्दात ही संक्षिप्त प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील वरिष्ठांनी सुद्धा राज्यातील प्रतिनिधींना या विषयावर शांत राहण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे.

मागील अनेक दिवसांपासून शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबतच्या युतीबाबत प्रतिकूल मत नोंदवलेले आहे. परंतु, पंढरपूर येथील सभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत थेट भूमिका न मांडता भाजपावर टीका केली होती आणि संभ्रम कायम ठेवला आहे. दरम्यान, शिवसेनेचे इतर नेते सुद्धा युतीबाबत एकही अनुकूल मत व्यक्त करताना दिसत नसल्याने सस्पेन्स वाढत आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x