26 April 2024 3:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

शिवसेनेच्या चित्रपट सेनेचा अति उतावळेपणा प्रेक्षकांना ‘ठाकरे’ चित्रपटापासून दूर लोटेल?

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. परंतु, २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा सिनेमा आता शिवसेना चित्रपट सेनेच्या अतिउत्साही पदाधिकाऱ्यांमुळे प्रेक्षकांना दूर लोटण्याची शक्यता आहे. कारण बाळा लोकरे यांनी पोस्ट टाकली आहे की २५ जानेवारीला ‘ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, त्या दिवशी इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा नेमका प्रजासत्ताकदिनाच्या आदल्याच दिवशी प्रेक्षकांना मिळणार आहे.

तसेच जर तसं न झाल्यास शिवसेना स्टाइलने उत्तर देऊ’, असे सांगितले आहे. त्यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमुळे पक्षावर अनेकांनी टीका केली आहे. विशेष म्हणजे सत्तेत असून सुद्धा मराठी सिनेमा आणि प्राईम-टाईम मिळण्यासाठी काहीच न करू शकलेली शिवसेना चित्रपट सेना सध्या टीकेचं लक्ष होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी बाळा लोकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेची लिंक शेअर करत टीका केली आहे. ‘ही केवळ झुंडशाही असून याचा निषेध आहे’, असे फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

वास्तविक सिनेमा चांगला किंवा वाईट हे सिनेमा पाहिल्यानंतरच कळत आणि त्यासाठी आधी सिनेमा पाहणं गरजेचं आहे हे वास्तव माहित असताना शिवसेनेचे अति उत्साही पदाधिकारी अप्रत्यक्षरित्या प्रेक्षकाला सिनेमापासून दूर लोटत आहेत याची त्यांना जाणीव नसावी. परंतु, सध्या सिनेमा प्रदर्शनाच्या जवळ येताच काहीतरी चर्चा घडवून आणायची हे नित्याचेच झाले आहे. परंतु, स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे हे मोठं नाव असताना सुद्धा शिवसेना पदाधिकाऱ्यांना हे सर्व प्रकार करावे लागत असल्याने अनेक राजकीय विश्लेषकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुळे निर्मात्यांनी पुढे येऊन या अतिउतावळ्या पदाधिकाऱ्यांना आवर घालण्याची गरज आहे. आधीच अनेकांना स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाला सचिन खेडेकरांचा आवाज रुचलेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या वरिष्ठांनी या अशा विषयांना आवर घालणे गरजेचे आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x