24 April 2024 9:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

भारतात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर सर्वाधिक गुन्हे दाखल : एडीआर अहवाल

नवी दिल्ली : एडीआर म्हणजे ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ ने प्रसिध्द केलेल्या अहवालात देशातील एकूण २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि २ केंद्रशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर सर्वाधिक गुन्हे दाखल असल्याचे अहवालात उघड झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकूण २२ गुन्हे दाखल असून त्यातील ३ गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे आहेत.

तसेच केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे गुन्हे नावावर असण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यावर ११ गुन्ह्यांची नोंद आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्यावर ३ गुन्ह्यांची नोंद आहे.

श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे सर्वोच्य स्थानी असून, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार हे देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री असल्याचे अहवालात उघड झाले आहे.

श्रीमंत मुख्यमंत्र्याची यादी पुढील प्रमाणे;
आंध्र प्रदेश – चंद्राबाबू नायडू : एकूण संपत्ती १७७ कोटी
अरुणाचल प्रदेश – पेमा खांडू : एकूण संपत्ती १२९ कोटी
पंजाब – कॅप्टन अमरिंदर सिंग : एकूण संपत्ती ४८ कोटी

गरीब मुख्यमंत्र्याची यादी पुढील प्रमाणे;
त्रिपुरा – माणिक सरकार : एकूण संपत्ती २६ लाख
पश्चिम बंगाल – ममता बॅनर्जी : एकूण संपत्ती ३० लाख रुपये
जम्मू-काश्मिर – मेहबूबा मुफ्ती : एकूण संपत्ती ५५ लाख रुपये

सिक्कीमचे मुख्यमंत्री हे सर्वाधिक शिक्षण घेतलेले मुख्यमंत्री असून त्यांनी पीएचडी पूर्ण केली आहे. देशातील एकूण मुख्यमंत्र्यांपैकी ३९ टक्के मुख्यमंत्री हे पदवीधर असून ३२ टक्के मुख्यमंत्र्यांनी मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले आहे. १० टक्के मुख्यमंत्री माध्यमिक शिक्षण घेतलेले असून, १६ टक्के मुख्यमंत्री पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे.

दुर्दैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अव्वल स्थानी आहेत पण सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद असलेले म्हणून ज्यात ३ गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x