26 April 2024 3:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

ED Vs Xiaomi | शाओमी कंपनीचा ईडीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकावल्याचा गंभीर आरोप

ED Vs Xiaomi

ED Vs Xiaomi | चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी शाओमी कॉर्पने तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयावर (ईडी) अत्यंत गंभीर आरोप केला आहे. कंपनीने अलीकडेच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आर्थिक गुन्ह्यासंदर्भात चौकशीदरम्यान धमकावण्यासह जबरदस्ती आणि शारीरिक हिंसाचाराचा आरोप केला आहे. चीनी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात ४ मे रोजी तक्रार दाखल केली. रॉयटर्सने कोर्टात दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे ही माहिती दिली आहे.

The Xiaomi Corp company has alleged coercion and physical violence along with intimidation of their senior officers during interrogation in the case of financial crime in the past :

न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रातही आरोप :
न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रात म्हटले आहे की, ईडीच्या अधिकाऱ्यांनी भारतातील शाओमी कॉर्पचे माजी व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन, सध्याचे मुख्य वित्तीय अधिकारी समीर बी.एस.राव आणि त्यांच्या कुटुंबियांना गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. तसेच तपास यंत्रणेच्या इच्छेनुसार वक्तव्य केले नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही म्हटले आहे. मात्र, ईडीने या प्रकरणाला न्यायप्रविष्ट ठरवत यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

५,५५१ कोटी रुपये जप्त :
गेल्याच आठवड्यात भारतीय एजन्सीने शाओमी कॉर्पचे भारतीय युनिट शाओमी टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या बँक खात्यात पडून असलेले 5,551 कोटी रुपये जप्त केले होते. कंपनीने रॉयल्टीच्या आडून बेकायदा परदेशी पेमेंट केल्याचे एजन्सीने त्यावेळी म्हटले होते. मात्र शाओमीने आपली सर्व रॉयल्टी पेमेंट वैध असल्याचं म्हटलं आहे. नुकतंच एका न्यायालयानं शाओमीच्या वकिलांच्या अर्जावर सुनावणी करताना चौकशी एजन्सीच्या मालमत्ता गोठवण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ मे रोजी होणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: ED Vs Xiaomi serious allegations from company check details 07 May 2022.

हॅशटॅग्स

#ED(8)#ED Vs Xiaomi(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x