20 April 2024 4:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

भाजपची डोकेदुखी वाढणार; या ७ राज्यांमध्ये काँग्रेस करणार प्रादेशिक पक्षांशी आघाडी

नवी दिल्ली : यूपी आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसशी येथील अनुक्रमे बहुजन समाज पार्टी – समाजवादी पार्टी आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसशी आघाडी होण्याची काहीही चिन्हे नसली तरी इतर राज्यांतील प्रादेशिक पक्ष मात्र राष्ट्रीय काँग्रेसशी आघाडी करण्यास तयार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्याविरोधात लढण्यासाठी काँग्रेसने ७ राज्यांत तिथल्या प्रादेशिक पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रमुख राज्यांमध्ये दक्षिणेतील ४ राज्य ज्यामध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या प्रमुख राज्यांचा समावेश आहे. तर उत्तरेकडून बिहार आणि झारखंडचा समावेश आहे. तर भाजपसाठी महत्वाचा असलेल्या जम्मू-काश्मीरचा समावेश आहे.

या राज्यांतील प्रबळ पक्ष काँग्रेसशी आघाडी करायला पूर्ण तयार असल्याचे समजते. तामिळनाडूतील द्रमुक, आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडूंचा सत्ताधारी तेलगू देसम, कर्नाटकात जनता दल (सेक्युलर), केरळमधील काही स्थानिक प्रादेशिक पक्ष, बिहारमध्ये लालू यादवांचा आरजेडी तसेच जीतनराम मांझी यांचा हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक समता पक्ष आणि जम्मू-काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स यांची काँग्रेसशी आघाडी झाल्यात जमा आहे.

केवळ त्यांच्यात जागावाटपाची महत्वपूर्ण बोलणी होणे शिल्लक आहे. परंतु, त्यात अडचणी येणार नाहीत, असे राष्ट्रीय काँग्रेसचे म्हणणे आहे. आघाडीतील पक्षांच्या साथीने तब्बल ४०० जागा लढवण्याच काँग्रेसच ध्येय असल्याचे आहे.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x