18 April 2024 6:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 18 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 4 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 33 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Tinna Rubber Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 3 वर्षात 1 लाख रुपयाच्या गुंवतवणुकीवर दिला 4.42 कोटी परतावा Lorenzini Apparels Share Price | 27 रुपयाच्या शेअरची कमाल, मल्टिबॅगर परताव्यसह स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सचा लाभ Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याची बातमी, सकारात्मक तेजीचे संकेत Stocks To Buy | अल्पवधीत मालामाल होण्याची संधी, हा शेअर देईल 35 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
x

Chanakya Niti | पैसे कमावण्यासाठी कधीही या चुका करू नका | श्रीमंत माणूसही कंगाल होईल

Chanakya Niti

Chanakya Niti | कुशल अर्थशास्त्रज्ञ मानल्या जाणाऱ्या आचार्य चाणक्यांनी पैसा आणि लक्ष्मीसंबंधी अनेक नीती सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्यांनी पैशाबाबत एक महत्त्वाचे धोरण सांगितले आहे. कमाई, खर्च, भोग आणि गुंतवणूक यांच्याशी संबंधित चाणक्यांचे हे धोरण समजून घेतले तर तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल.

पैशापेक्षा जास्त महत्वाच्या 3 गोष्टी :
असे म्हटले जाते की, पैशातून व्यक्ती त्याला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट विकत घेऊ शकते आणि स्वत:ची तसेच आपल्या कुटुंबाचीही सहज सोय करू शकते. त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीत हातात पैसा असल्याने व्यक्तीवर विश्वास राहतो, परंतु आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात सांगितले आहे की, पैशापेक्षा जास्त महत्वाच्या अशा 3 गोष्टी आहेत.

प्रेम :
आचार्य चाणक्य म्हणतात की, जगात नातेसंबंध जपणं खूप कठीण आहे. खरं नातं मिळणं हीसुद्धा नशिबाची गोष्ट आहे. जर कोणी तुमच्यावर खरंच प्रेम करत असेल आणि तुमच्या भल्याचा विचार करत असेल, तर अशा लोकांसमोर पैशाला किंमत नसते. कारण पैसा कधीही कुणाचं प्रेम विकत घेऊ शकत नाही.

धर्म :
धर्माच्या माध्यमातून मनुष्याची ओळख योग्य-अयोग्य अशी केली जाते, त्यामुळे पैशासाठी धर्म पणाला लावणे मूर्खपणाचे आहे. चाणक्य नीतीनुसार, पैसा कमावण्यासाठी जर कोणी धर्माचा त्याग केला तर अशा लोकांना समाजात कसलाही आदर नसतो.

स्वाभिमान :
आचार्य चाणक्यांच्या मते या जगात तुमच्यासाठी स्वाभिमानाशिवाय दुसरं काही असू नये. स्वाभिमान वाचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागले तरी संकोच करू नका. एखादी व्यक्ती आपल्या मेहनतीने पुन्हा पैसे कमवू शकते, पण स्वाभिमान गेला तर तो परत मिळणे फार कठीण असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Chanakya Niti rules on money check details 14 June 2022.

हॅशटॅग्स

#Chanakya Niti(4)#ChanakyaNiti(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x