20 April 2024 1:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा
x

१५३ रुपयांत १०० टीव्ही चॅनेल दाखवाः दूरसंचार नियामक प्राधिकरण

नवी दिल्ली : TV वरील आवडीचे चॅनेल निवडण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’ ने ग्राहकांना ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ग्राहकांचे हित लक्षात घेवून ट्रायने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रति महिना १५३ रुपयांत १०० चॅनेल दाखवण्याचे थेट निर्देश ट्रायने केबल ऑपरेटर आणि डीटीएच’सेवा देणाऱ्यांना दिले आहेत. तसेच ग्राहकांनी TV वरील १०० चॅनेलची निवड ३१ जानेवारीपर्यंत करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत.

पुढील महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे १ फेब्रुवारीपासून सदर नियम अमलात येणार आहे. केबल ऑपरेटर आणि DTH सेवा पुरवठादारांनी ग्राहकांना प्रति महिना १५३.४० रुपयांप्रमाणे १०० चॅनेल दाखवावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात GSTचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. मात्र या शंभर चॅनेलमध्ये एकाही HD चॅनेलचा समावेश नसणार आहे. २ चॅनेलसोबत १ HD चॅनेल निवडता येवू शकतो, असे काही मीडिया एजन्सीने म्हटले होते. एका चॅनेलसाठी १९ रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजण्याचा आणखी एक निर्णय TRAI ने रद्द ठरवला आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x