26 April 2024 3:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Eknath Shinde | गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी करत आहेत शिंदें सोबत सेटलमेंट | पण पळालेले आमदार घाबरल्याची माहिती

Eknath Shinde

Eknath Shinde | राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ भाजपने महाविकास आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीत विजयाचे दावे करणाऱ्या महाविकास आघाडी पुन्हा तोंडघशी पडलीये. मात्र, या निकालाने शिवसेना आणि काँग्रेसमधील असंतोष समोर आला आहे. त्यातच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असून, ते नाराज असल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान, या निकालाने चेक मिळालेल्या उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदारांची तातडीने बैठक बोलावली आहे.

एकनाथ शिंदे सूरतमध्ये :
एकनाथ शिंदे सूरतमध्ये असल्याचं बोललं जात आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार काठावर पास झाले आहेत. शिवसेनेचे तब्बल 3 आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांची 9 अशी एकूण 12 मतं फुटल्याचं कालच्या विधान परिषद निवडणुकी स्पष्ट झालं आहे.

गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी करत आहेत आमदारांसाठी सर्व नियोजन :
यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. गुजरातचे गृहमंत्री असलेले सुरतचे भाजपचे आमदार हर्ष सांघवी हे या आमदारांसाठी सर्व नियोजन करत असल्याचं समोर आलं आहे. सांघवी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. हे सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचंही समोर आलं आहे. मात्र पळालेले अनेक आमदार हे प्रचंड घाबरल्याचं वृत्त आहे आणि त्यातील एका आमदाराच्या छातीत दुखू लागलं आहे. त्या आमदाराला इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde in Gujarat Hotel check details 21 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x