28 March 2024 5:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर
x

Video Viral | कायद्याची परवा न करता अशा आमदारांना रस्त्यात तुडवा | बाळासाहेबांच्या त्या आदेशाचा व्हिडिओ व्हायरल

Video Viral

Video Viral | एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40च्यावर आमदार फोडत गुवाहाटी येथून सवता सुभा मांडण्याची गणिते मांडत आहेत. दरम्यान शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह घेण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ शिंदे गटातील 12 आमदारांचे निलंबण करण्याची तयारी उद्धव ठाकरेंकडून सुरू आहे. यामुळे एकनाथ शिंदे आणि ठाकरे यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. अरविंद सावंत यांनी कारवाई करणार असल्याचे सांगताच एकनाथ शिंदे गटाकडून तातडीने बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

शक्ती प्रदर्शन केले :
एकनाथ शिंदेंनी ४६ आमदार आपल्सासोबत असल्याचा दावा केला होता. तसं शक्ती प्रदर्शन देखील त्यांनी केले. एकनाथ शिंदेंच्या गटातून बाळापूरचे आमदार नितीन देशमुख आणि कळंबचे आमदार कैलास पाटील परत महाराष्ट्रात आले आहेत. शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे जवळपास ८० टक्के शिवसेनेलाच एकनाथ शिंदेंनी सुरुंग लावला आहे. परत आलेल्या शिवसेना आमदारांनी आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे.

राज्य सरकार अल्पमतात आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेला आहे. त्यामळं शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावंच लागेल. तसंच हे सरकार बहुमतात आहे की नाही हे विधानसभेत स्पष्ट होईल, असं शरद पवारांनी ठणकावून सांगितलं. त्यामुळे या बंडखोर आमदारांचा राज्यात प्रवेश झाल्यानंतर शिवसैनिकांसहित राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरतील अशी दाट शक्यता आहे. कदाचित मोठ्या प्रमाणावर हेलिकॉप्टर्स मॅनेज करून तुकड्या तुकड्याने या आमदारांना गुजरात सीमेवरून थेट राजभवनात उतरवलं जाऊ शकतं असा अंदाज बांधला जातोय. मात्र त्यापूर्वी समाज माध्यमांवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ आणि त्यातील आदेश व्हायरल होऊ लागला आहे.

काय आहे तो व्हिडिओ :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Video Viral of Balasaheb Thackeray on social media check details 24 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x