24 April 2024 1:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा सर्वात स्वस्त शेअर तेजीत, 2 दिवसात दिला 14% परतावा, यापूर्वी 2926% परतावा दिला Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता IREDA Share Price | IREDA शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल? तज्ज्ञांनी जाहीर केला सपोर्ट लेव्हल आणि रेझिस्टन्स लेव्हल Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट आली, शेअर मोठ्या रॅलीसाठी सज्ज झाला, किती फायदा होईल? Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली IPO GMP | स्वस्त IPO शेअर आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 113 टक्के परतावा, GMP चा धुमाकूळ
x

कायदेतज्ञांचा सल्ला आणि अनेकांच्या आमदारकी जाण्याची भीती | लवकर फ्लोअर टेस्टच्या मागणीसाठी फडणवीस राजभवनावर

BJP leader Devendra Fadnavis

Devendra Fadnavis | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काही वेळापूर्वीच राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला पोहचले आहेत. उद्धव ठाकरे सरकारविरोधात त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी बंड पुकारलं आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या ५१ आमदारांनी बंड पुकारलं आहे तसंच आम्ही पाठिंबा काढणार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे.

दिल्लीत कायदे तज्ज्ञांनी वास्तव मांडलं :
आज फडणवीस कायदे तज्ज्ञांना घेऊनच दिल्लीत दाखल झाले होते. या कायदे तज्ज्ञांनी बैठकीत दिलेल्या सल्ल्याप्रमाणे अनेक बंडखोर आमदारांच्या आमदारकी कायद्यानुसार रद्द होऊ होऊ शकतात हे अधोरेखित करण्यात आलं आहे. तसेच त्यानंतर इतर बंडखोर आमदारांमध्ये चलबिचल होऊन ते सुद्धा पुन्हा सेनेला जाऊन मिळतील अशी शक्यता भाजपाला असल्याने सुप्रीम कोर्टाच्या निकालापर्यंत न थांबता थेट राज्यपालांचे विशेष अधिकार वापरून पुढे जाण्याचा निर्णय घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठं बंड पुकारलं आहे. त्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आता जी माहिती मिळते आहे त्यानुसार देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला पोहचले आहेत. सरकार अल्पमतात आलं आहे त्यांना आता लवकरात लवकर फ्लोअर टेस्ट घेतली जावी ही मागणी करत फडणवीस हे राज्यापलांकडे पोहचले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP leader Devendra Fadnavis meets governor at Raj Bhavan check details 28 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x