19 April 2024 7:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

फडणवीस समर्थकांमध्ये अमित शाहांबद्दल खदखद वाढली | फलकांवरून अमित शाहांचे फोटो हटवले

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांनी लावलेले होर्डिंग नागपुरात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या होर्डिंग मधून देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अमित शहा यांचा फोटो गायब आहे.

नागपूर शहरातील विविध भागांमध्ये होर्डिंग : अमित शाह गायब
नागपूर शहरातील विविध भागांमध्ये लागलेल्या या होर्डिंग वर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नागपूरचे विधान परिषद सदस्य आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांचे फोटो आहेत परंतु या फोटोतून अमित शहा यांचा फोटो गायब असल्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

केंद्रातून दुय्यम स्थानाचे आदेश :
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीतून फडणवीस यांनी मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले. मोदी यांनी दोनवेळा फोन केल्याचेही वृत्त झळकले. यानंतर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी व्हावे असे ट्विट करत मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यास भाग पाडले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचा शपथविधी पार पाडला.

सगळ्या प्रकारात अमित शहांचाच हात :
या सगळ्या प्रकारात अमित शहांचाच हात आहे आणि त्यांच्यामुळेच फडणवीस यांनी ठाकरे सरकार घालवण्यासाठी अविरत प्रयत्न करूनही त्यांची उपमुख्यमंत्रिपदावर बोळवण करण्यात आली, अशी प्रतिक्रिया फडणवीस समर्थकांमध्ये उमटत आहे. आज भाजपकडून मुंबई कार्यालयात जल्लोष करण्यात आला, पण या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांवरून अमित शहा गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर नागपूरमध्येही माजी महापौर संदीप जोशी यांनी लावलेल्या फलकावरून अमित शहा गायब होते. कधी नव्हे ते अमित शहांचा फोटो बॅनर करून गायब झाल्याने भाजपमधील नाराजी समोर आली आहे.

भाजपच्यावतीने मुंबईमध्ये कार्यक्रम पण फडणवीस अनुपस्थित :
आज सकाळी भाजपच्यावतीने मुंबईमध्ये कार्यक्रम ठेवण्यात आला होता, त्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रविण दरेकर अनुपस्थीत होते. त्यामुळे अजून चर्चाना उधाण आले होते. आता नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात दाखल झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Devendra Fadnavis supporters not happy on Amit Shah check details 01 July 2022.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x