29 March 2024 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल
x

तर...पंतप्रधानपदासाठी शिवसेना गडकरींना पाठिंबा देईल

नवी दिल्ली: लवकरच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण कठीण होणार आहे. अशा राजकीय पेच निर्माण करणाऱ्या परिस्थितीत जर पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरींचं यांचं नाव पुढे आल्यास शिवसेना त्यांना जाहीर पाठिंबा देईल, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हणाले.

तसेच त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती करणार नसल्याचा सुद्धा पुनरुच्चार केला. आमच्या शब्दकोषात युती हा शब्द नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्ष केवळ स्वत:चा विचार करते. त्यामुळे यापुढे आम्ही सुद्धा केवळ आमचा विचार करतो, असं म्हणत राऊत यांनी शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचं अप्रत्यक्ष संकेत दिले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीचे निकाल त्रिशंकू लागतील. अशा राजकीय परिस्थितीत नितीन गडकरी सुद्धा पुढील सरकारचं नेतृत्त्व करू शकतात, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.

शिवसेनेनं मागील ५ वर्षांमध्ये बहुतेक वेळा नरेंद्र मोदींच्या विरोधात भूमिका घेतली आहे. राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी थेट पंतप्रधानांना लक्ष्य केलं. त्यावेळी सदर प्रकरणाची संसदेच्या संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी राहुल गांधींनी केली होती. यावेळी शिवसेनेनं सुद्धा संसदेच्या संयुक्त संसदीय समितीमार्फत राफेल लढाऊ विमानांच्या कराराची सखोल चौकशी करण्याची मागणी करत भारतीय जनता पक्षाच्या अडचणीत वाढ केली होती.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x