20 April 2024 12:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

GST on Rented Home | भाड्याच्या घरात राहणाऱ्यांचे ऐतिहासिक अच्छे दिन सुरु | मोदी सरकारला 18 टक्के GST द्यावा लागणार

GST on Rented Home

GST on Rented Home | केवळ स्वयंपाकघराचे बजेटच नव्हे, तर नवीन जीएसटीत घर भाडेही अस्थिर करण्याच्या तयारीत मोदी सरकार आहे आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने 18 जुलैपासून देशभरात निवासी भाड्यावर 18 टक्के जीएसटी लागू केला आहे. अधिसूचनेनुसार, जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत व्यक्तीला भाड्याने दिलेल्या निवासी घराला 18 टक्के कर आकारला जाईल. शिवाय, भाडेकरूला कायदेशीर जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवून, कर भरणे आवश्यक असेल. मालकावर घर भाड्याने दिल्यावर जीएसटी आकारल्यास मालक त्याची वसुली भाडोत्र्याकडून करणार हे साहजिक आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूला प्रचंड आर्थिक फटका बसणार आहे.

भाडेकरूला कर लागू होणार :
या दुरुस्तीमुळे भाड्याने निवासी मालमत्ता घेणाऱ्या भाडेकरूला कर लागू होणार आहे. जीएसटी कर सल्लागार रवीद्रन मुथुस्वामी यांनी नमूद केले की, या दुरुस्तीचा अनपेक्षित परिणाम असा आहे की, जी व्यक्ती किंवा मालक, जी जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत आहे आणि व्यावसायिक खर्च म्हणून नव्हे तर वैयक्तिक वापरासाठी निवासी मालमत्ता भाड्याने घेतली आहे, त्यालाही कर लागू केला जाईल. यासाठी सरकारच्या हस्तक्षेपाची गरज होती असं त्यांनी म्हटलं आहे.

पूर्वी निवासी मालमत्तांवर सेवा कर नव्हता :
ते पुढे म्हणाले की, भारतासारख्या देशात, जिथे बहुसंख्य लोकांकडे घरे नाहीत, अशा ठिकाणी भाड्यावरील कर आकारणी हा सेवाकराच्या काळापासून एक संवेदनशील विषय आहे. “२००७ मध्ये केवळ व्यावसायिक मालमत्तेच्या मर्यादेपर्यंतच भाड्यावर सेवा कर लागू करण्यात आला होता. निवासी मालमत्ता वगळण्यात आली होती आणि २०१७ मध्ये जेव्हा जीएसटी लागू करण्यात आली होती तेव्हाही ती सुरू ठेवण्यात आली होती,” असं त्यांनी नमूद केलं.

नवीन घेणारे देखील आर्थिक पेचात अडकणार :
मात्र या निर्णयामुळे गृहखरेदीदारांच्या भावनेवर देखील मोठा परिणाम होईल, असा विश्वास नरेडको वेस्टचे उपाध्यक्ष हितेश ठक्कर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, रेरा कमिटीचे अध्यक्ष आणि बिल्डर्स ऑफ असोसिएशनचे अध्यक्ष आनंद गुप्ता यांनी सांगितले की, रिव्हर्स चार्ज यंत्रणेअंतर्गत नोंदणीकृत जीएसटी क्रमांक (२० लाख रुपयांची उलाढाल असलेल्या) सर्व निवासी युनिट्ससाठी हे लागू आहे. छोटे युनिटधारक अप्रभावित राहतील. रिअल इस्टेटच्या दृष्टीने विचार केल्यास रेंटल हाऊसिंगला व्यवसाय म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी हा धक्का असल्याचे ते म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: GST on Rented Home 18 percent will be applicable check details 19 July 2022.

हॅशटॅग्स

#GST on Rented Home(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x