20 April 2024 10:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा Gold Rate Today | बोंबला! आजही सोन्याचा भाव मजबूत उसळला, तुमच्या शहरातील कॅरेट प्रमाणे नवे दर तपासून घ्या Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
x

EPF Interest Money | केंद्र सरकार ईपीएफवरील व्याजदर वाढवणार?, केंद्रीय मंत्र्यांनी सभागृहात हे उत्तर दिलं

EPF Interest Money

EPF Interest Money | 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ठेवींवरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात येणार नाही. ही माहिती कामगार व रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

सरकार फेरविचार करणार का :
खरे तर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्याबाबत सरकार फेरविचार करणार का, असा प्रश्न रामेश्वर तेली यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी व्याजदराबाबत फेरविचार करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले.

अल्पबचत योजनांपेक्षा अधिक :
जनरल प्रॉव्हिडंट फंड (७.१० टक्के), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (७.४० टक्के) आणि सुकन्या समृद्धी खाते योजना (७.६० टक्के) अशा इतर तुलनात्मक योजनांपेक्षा ईपीएफचा व्याजदर अधिक असल्याचेही रामेश्वर तेली यांनी सांगितले. तसेच ईपीएफवरील व्याजदर 8.10 टक्के देण्यास मान्यता देण्यात आली आहे असं केंद्र सरकारच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

ते म्हणाले की, हा व्याज दर ईपीएफला त्याच्या गुंतवणूकीतून मिळालेल्या उत्पन्नावर अवलंबून असतो आणि असे उत्पन्न केवळ ईपीएफ योजना, 1952 नुसार वितरित केले जाते. ते म्हणाले की, सीबीटी आणि ईपीएफने 2021-22 साठी 8.10 टक्के व्याजदराची शिफारस केली होती, ज्याला सरकारने मान्यता दिली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: EPF Interest Money central government reply in parliament check details 21 July 2022.

हॅशटॅग्स

#EPF Interest Money(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x