28 March 2024 3:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या Zomato Share Price | झोमॅटो शेअरने ब्रेकआऊट दिला, अल्पावधीत मोठी कमाई होणार, पुढील टार्गेट प्राइस जाणून घ्या
x

Nippon Mutual Fund | 10000 रुपयांच्या मासिक SIP'ने 17.58 लाख रुपये दिले, या फंडात तुमची संप्पती वेगाने वाढवा

Nippon Mutual Fund Investments

Nippon Mutual Fund | मागील 3 वर्षांत या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड एसआयपीने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 24.70 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. आणि सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 94 टक्के परतावा गुंतवणूकदारांनी कमावला आहे. या कालावधीत प्रती वार्षिक परतावा सुमारे 22 टक्के एवढा आहे.

म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटर :
जर आपल्याला दीर्घकाळासाठी गुंतवणूक करयची असेल तर तज्ञ नेहमी स्मॉल-कॅप म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. व्हॅल्यू रिसर्चच्या एका अभ्यासानुसार, गुंतवणूकदारांनी अशा स्मॉल-कॅप म्युच्युअल फंडांमध्ये अजिबात गुंतवणूक करू नये, ज्यांची मुदत 7 वर्षांपेक्षा कमी असते. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराचे गुंतवणुकीचे लक्ष्य 7 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल, तर स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीसाठी उत्तम आणि फायदेशीर इक्विटी पर्याय असू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. मागील सात वर्षांत, या योजनेत 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणूकीचे आता 17.58 लाख रुपये झाले आहेत.

म्युच्युअल फंड रिटर्न कॅल्क्युलेटर :
स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड एसआयपीने मागील 3 वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल 24.70 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. आणि या फंडने सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 94 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कालावधीत मिळालेला प्रती वार्षिक परतावा सुमारे 22 टक्के आहे. गेल्या 5 वर्षांत, या म्युचुअल फंडाने 17.45 टक्के सरासरी वार्षिक परतावा दिला आहे, तर या कालावधीत त्याचा एकूण परतावा 123.68 टक्के आहे. एकूण प्रती वार्षिक परतावा देखील 13.60 टक्के च्या आसपास आहे. त्याचप्रमाणे, 16 सप्टेंबर 2010 रोजी सुरू झाल्यापासून, या म्युच्युअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 20 टक्के वार्षिक या सरासरी दराने परतावा मिळवून दिला आहे. तर या संपूर्ण कालावधीतील या योजनेचा एकूण परतावा 750 टक्क्यांहून अधिक होता.

SIP कॅल्क्युलेटर :
जर तुम्ही या योजनेत तीन वर्षांपूर्वी SIP मोडमध्ये दरमहा 10,000 रुपये ची गुंतवणूक केली असती, तर ती या कालावधीत तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.86 लाख झाले असते. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी 10,000 रुपये मासिक SIP सुरू केली असती, तर त्याचे गुंतवणूक मुख्य आज 10.49 लाख झाली असते. त्याचप्रमाणे, जर तुम्ही 7 वर्षांपूर्वी या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड योजनेत 10,000 रुपयेची मासिक SIP सुरू केली असती, तर ती आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 17.58 लाख रुपये झाले असते.

खालील फंडांनी दिला आहे उत्कृष्ट परतवा :
1. निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन
2. एसबीआय स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन
3. अॅक्सिस स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन
4. कोटक स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन
5. कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन.

अशा भरपूर म्युच्युअल फंड योजना आहेत, ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीमध्ये चांगला परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nippon Mutual Fund Investments return for long term with benefits on 30 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x