24 April 2024 11:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

दिघे कुटुंबीय शिंदेंवर संतापले | सत्तेसाठी किती खालच्या थराला जाल, दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा शिंदेंनी केल्याचा आरोप

Kedar Dighe

Kedar Shinde | ठाण्यातले शिवसेनेचे दिग्गज नेते अशी ओळख असलेले आनंद दिघे यांच्याबाबत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार आहे. योग्य वेळ आल्यावर मी बोलणार आहे. जेव्हा माझी मुलाखत होईल तेव्हा राज्यात भूकंप होईल असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगावातल्या सभेत केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद दिघेंबाबत नेमकं काय म्हणाले :
“आम्ही दोघंही धर्मवीर या आनंद दिघेंवर आधारित असलेल्या सिनेमांत आहोत. धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत आम्ही कामही केलं आहे. दिघेसाहेबांना सगळा महाराष्ट्र ओळखतो. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार तळागाळात पोहचवण्याचं काम आनंद दिघे यांनी केलं. त्यासाठी रात्रीचा दिवस केला. पायाला भिंगरी लावून त्या माणसाने शिवसेना वाढवली. शहरी भाग, आदिवासी वस्त्या, पाडे या ठिकाणी शिवसेना पोहचवली.

आनंद दिघे यांचे कुटुंबीय संतापले :
मात्र मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघे यांनी एक सणसणीत ट्विट केलं आहे आणि त्यात ट्विटमधून त्यांनी एकनाथ शिंदे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं आहे. आनंद दिघे यांच्याबाबत एवढं काही घडलं हे तुम्हाला माहीत होतं, तर तुम्ही आजपर्यंत गप्प का बसला? असा थेट सवाल केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलाय. त्यावरून आता राज्यातलं राजकारण पुन्हा पेटलं आहे.

केदार दिघे नेमकं काय म्हणाले :
याबाबत ट्विट करत केदार दिघे म्हणतात, मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार….मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे.सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल? असा थेट सवाल त्यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Kedar Dighe slams CM Eknath Shinde over politics against Shivsena check details 30 July 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)#Kedar Dighe(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x