20 April 2024 3:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Stocks in Focus | छप्परफाड परतावा, अदानी ग्रुपच्या या 3 कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना दिला 4 पट परतावा

Adani group Stocks are in focus

Stocks in Focus | एका वर्षात सर्वाधिक नफा देण्यात अदानी समूहाचे हे 3 शेअर्स अग्रेसर आहेत. त्यांचे शेअर्स गेल्या एका वर्षातील सर्वात मोठे मल्टीबॅगर स्टॉक असल्याचे सिद्ध झाले आहे. या काळात गुंतवणूकदारांचा पैसा जवळपास चौपट झाला आहे.

अदानी समूहाच्या 3 कंपन्यांचे शेअर्स हे गेल्या वर्षभरातील सर्वात मोठे मल्टीबॅगर स्टॉक ठरले आहेत कारण त्यांनी फक्त वर्षभरातच गुंतवणूकदारांचा पैसा चौपट केला आहे. या काळात गुंतवणूकदारांनी अदानी समूहात गुंतवणूक करून जबरदस्त पैसा कमावला आहे. अदानी पॉवर स्टॉकने आपल्या 52 आठवड्यांच्या 70.35 रुपये या नीचांकी पातळीवरून 354 रुपयांच्या उच्चांका पर्यंत झेप घेतली आहे. ह्या स्टॉक मध्ये जवळपास 5 पट झाली आहे, तर अदानी गॅसने 843.00 रुपये च्या नीचांकी पातळीवरून 3,389 रुपये आणि अदानी ट्रान्समिशनने 894.00 रुपयेपासून 3548 रुपयांच्या उच्चांकाला स्पर्श केला आहे.

एका वर्षात सुमारे 5 पट परतावा :
अदानी पॉवरचा स्टॉक गुरुवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये 347.25 रुपयांवर बंद झाला. मागील एका वर्षात ह्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 284.76 टक्के परतावा दिला आहे. अदानी पॉवरच्या शेअरच्या किंमतीत मागील एका आठवड्यात 6.38 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. आणि गेल्या एका महिन्यात स्टॉक मध्ये 30.88 टक्के वाढ झाली आहे, तर मागील 3 महिन्यांत स्टॉक ने 28.59 टक्के परतावा दिला. अदानी पॉवरने आपल्या गुंतवणूकदारांना मागील तीन वर्षांत 457 टक्के आणि 5 वर्षांत 941 टक्के इतका जबरदस्त परतावा मिळवून देऊन श्रीमंत केले.

अदानी गॅस शेअर्स :
अदानी गॅस चा शेअर गुरुवारी ट्रेडिंग सेशन मध्ये 3349.65 रुपयांवर बंद झाला होता . मागील आठवड्यात अदानी गॅसच्या शेअर किंमतीमध्ये 11.44 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. त्याच वेळी, अदानी गॅसच्या शेअरच्या किमती एका महिन्यात सुमारे 40 टक्के आणि मागील 3 महिन्यांत सुमारे 36 टक्के वाढल्या होत्या. जर आपण मागील 1 वर्षाच्या आकडेवारीचे निरीक्षण केले तर दिसेल की स्टॉक ने फक्त एक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 270.97 टक्के परतावा दिला आहे. आणि मागील 3 वर्षात 2076 टक्के नफा कमावला आहे.

अदानी ट्रान्समिशन :
गुरुवारी अदानी ट्रान्समिशनचा शेअर दिवसा अखेर 3530.45 रुपयांवर बंद झाला होता. अदानी ट्रान्समिशनच्या शेअरच्या किमतीत मागील एका आठवड्यात 17 टक्के वाढ झाली आहे, तर मागील 1 महिन्यात ती 45 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. अदानी ट्रान्समिशनच्या शेअरच्या किमतीत 3 महिन्यांत 26 टक्के वाढ झाली आहे. जर आपण मागील 3 वर्षांच्या कामगिरीवर नजर टाकली तर या कालावधीत अदानी ट्रान्समिशन स्टॉक ने 1608 टक्के आणि मागील 5 वर्षात 2751 टक्के इतका भरघोस परतावा दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Group Stocks are in focus for giving huge returns on 6 August 2022.

हॅशटॅग्स

#Adani Group(10)#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x