25 April 2024 5:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

Multibagger Stocks | 1 लाखाचे झाले 4 लाख रुपये, 7 महिन्यात दिला जबरदस्त परतावा, गुंतवणूकदार झाले लखपती

Multibagger Stocks

Multibagger Stocks | Integra Essentia स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मागील एका महिन्यात 110 टक्के परतावा दिला आहे. स्टॉकच्या या वर्षाच्या आतापर्यंतच्या कामगिरीचे निरीक्षण केले तर, 2022 मध्ये या स्टॉकने गुंतवणूकदारांना 300 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

मल्टीबॅगर स्टॉक :
पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे बरेच जोखमीचे असते. पण कधी कधी हे स्वस्त शेअर्स गुंतवणूकदारांना श्रीमंतही बनवतात. Integra Essentia हा अश्या काही पेनी स्टॉक्सपैकी एक आहे, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना छप्पर फाड परतावा दिला आहे. या स्मॉल कॅप पेनी स्टॉक कंपनीने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 110 टक्के परतावा दिला आहे. या वर्षाच्या आतापर्यंतच्या कामगिरीचे निरीक्षण केले तर असे दिसेल की, 2022 मध्ये गुंतवणूकदारांना 300 टक्के परतावा मिळाला आहे. या स्टॉकचा या वर्षीच्या मल्टीबॅगर स्टॉक लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे.

शेअर्सच्या किमती कालांतराने कशा वाढतात?
Integra Essentia हा पेनी स्टॉक NSE आणि BSE दोन्हीवर ट्रेडिंगसाठी उपलब्ध आहे. कंपनीचा शेअर सलग दोन ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किट वर ट्रेड करत आहे. मागील एका आठवड्याकची कामगिरी पहिली तर शेअर्सच्या किमतीमध्ये 5.50 टक्के ची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका महिन्यापूर्वी शेअर प्रति शेअर 3.15 रुपयांवर ट्रेड करत होता, आता शेअर सध्या 6.70 रुपये प्रति शेअरवर ट्रेड करत आहे. तर या वर्षात कंपनीच्या शेअरची किंमत 1.67 रुपयांवरून 6.70 रुपयांपर्यंत पोहोचली.

जर तुम्ही आठवड्यापूर्वी या स्टॉकवर एक लाख रुपये लावले असते तर तुम्हाला त्याचा परतावा म्हणून एक लाखावर 5500 रुपये परतावा मिळाला असता. त्याच वेळी, एक महिन्यापूर्वी, जर तुम्ही या स्टॉकवर एक लाख रुपये लावले असते, त्याचा परतावा म्हणून तुम्हाला 2.10 लाख रुपये मिळाले असते. त्याचप्रमाणे या वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्यांचा परतावा म्हणून 4 लाख रुपये झाला असता.

शेअरची कामगिरी :
इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे बाजार भांडवल 256 कोटी रुपये आहे. NSE वर कंपनीचा शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी 6.70 रुपये होती. तर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी 1.67 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks Integra Essentia share price return on 9 august 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x