20 April 2024 6:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

Credit card | तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर या 10 गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे, अन्यथा खूप नुकसान होईल

credit Card

Credit card | तुम्ही जो क्रेडिट कार्ड वापरता, त्यावर मिळणाऱ्या कर्जाची सुविधा निश्चित कालावधीसाठी कोणत्याही व्याजाशिवाय उपलब्ध करून दिली जाते. क्रेडिट कार्ड द्वारे पैसे खर्च करण्यासाठी आणि बिल पेमेंट करण्यासाठी एक ठराविक कालावधी दिला जातो. म्हणूनच लोकं क्रेडिट कार्डला जास्त प्राधान्य देतात. जर तुम्ही क्रेडिट कार्डचा योग्य वापर करत नसाल तर ती तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला क्रेडिट कार्डबद्दल अशाच 10 महत्वपूर्ण गोष्टी सांगणार आहोत, ह्या गोष्टी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

क्रेडिट कार्ड शुल्क :
तुम्ही जो क्रेडिट कार्ड वापरता, बँक त्यावर विविध शुल्क किंवा चार्ज आकारते. यामध्ये शुल्क, वार्षिक शुल्क, कार्ड बदलण्याचे शुल्क, विवरण शुल्क देखील आकारले जाते. जर तुम्ही पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड वापरत करत असाल, तर या सर्व शुल्कांची नीट माहिती असणे आवश्यक आहे.

क्रेडिट कार्ड व्याज दर :
क्रेडिट कार्डवरून कर्ज घेतल्यावर तुम्हाला एका ठराविक कालावधीसाठी अजिबात व्याज लागत नाही. पण त्या ठराविक वेळेत बिल भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही वेळेवर बिल भरले नाही तर तुम्हाला विलंब शुल्क भरावे लागेल. आणि घेतलेल्या कर्जावर व्याज ही आकारला जाईल.

क्रेडिट कार्ड मर्यादा :
जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड खरेदी करता. त्यावर तुम्हाला क्रेडिट लिमिट दिली जाते. ही तुमची कर्ज घेण्याची एक मर्यादा असते. त्याच मर्यादेत पैसे खर्च करावे लागतील. क्रेडिट कार्ड धारकाला वेळेवर पेमेंट करणे आवश्यक आहे. नाही तर त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होऊ शकतो.

क्रेडिट फी :
क्रेडिट कार्ड वापरताना तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिले जाते, ज्यावर तुम्हाला ठराविक कालावधीसाठी कोणत्याही व्याजाशिवाय ते कर्ज वापरायला दिले जाते. त्या निर्धारित कालावधीत तुम्हाला कर्जाची रक्कम वेळेवर भरावी लागेल. महिन्याच्या शेवटी देय असलेकी रक्कम भरावी लागते.

स्टेटमेंट :
तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट नेहमी तपासत राहणे आवश्यक आहे. हे तुमच्या क्रेडिट कार्ड द्वारे झालेले सर्व व्यवहार आणि व्यवहारातील त्रुटी दाखवते.

क्रेडिट कार्डवरील विलंब शुल्क :
क्रेडिट कार्ड वरील विलंब शुल्क टाळण्यासाठी तुम्ही खरेदी केलेल्या क्रेडिट कार्डवर तुम्हाला पैसे भरण्याची एक ठराविक वेळ दिली जाते. जर तुमचे 2 महिन्यांचे क्रेडिट कार्ड बिल तयार झाले असेल, तर तुम्ही तुमचे बिल वेळेवर भरून विलंब शुल्क टाळू शकता.

ऑफर्स आणि डिस्काउंट :
क्रेडिट कार्ड्समध्ये ऑफर्स आणि डिस्काउंट खूप फायदेशीर गोष्ट आहे. क्रेडिट कार्ड खरेदीवर तुम्हाला आकर्षक ऑफर आणि सूट आणि रिवॉर्ड पॉइंट देखील मिळतात. वेळोवेळी, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर तपासू शकता आणि त्याचा फायदा घेऊ शकता.

अन्य सुविधा :
एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्ड चा देखील वापर करू शकता, परंतु तुम्हाला त्यात जास्त व्याज आणि शुल्क द्यावे लागेल.

मासिक शुल्क :
क्रेडिट कार्डमध्ये, तुम्हाला दरमहा काही शुल्क द्यावे लागते, परंतु अनेक बँका कोणतेही शुल्क किंवा चार्ज आकारत नाहीत.

क्रेडिट स्कोअर :
क्रेडिट स्कोअर सकारात्मक ठेवणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारायचा असेल तर तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड अधिक चांगल्या पद्धतीने वापरावे लागेल, आणि वेळेवर त्याचे बिल भरावे लागेल. क्रेडिट कार्ड वापरताना झालेल्या एका चुकीमुळे तुम्हाला भविष्यात कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Credit card use and important points to know before using credit cards on 9 August 2022.

हॅशटॅग्स

#Credit Card(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x