25 April 2024 11:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला
x

Multibagger Penny Stocks | 17 रुपयाच्या शेअरने 11,225 टक्के परतावा दिला, अजून 50 परतावा देऊ शकतो, गुंतवणुकीची सुवर्ण संधी

Multibagger Penny Stock

Multibagger Penny Stocks | बाजारातील तज्ज्ञ आणि गुंतवणूकदार या कंपनीच्या शेअर्स बाबत जबरदस्त उत्साही दिसून येत आहेत. तज्ञ आणि ब्रोकर्स ह्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. ब्रोकरेज हाऊस एडलवाईसच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 3,127 रुपये पर्यंत जाऊ शकतो.

मल्टीबॅगर स्टॉक रिटर्न:
आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत, तो आहे दीपक नायट्रेट. दिपक नायट्रेट लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या भागधारकांना दीर्घ मुदतीत 11,225.66 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील 22 वर्षांत हा स्टॉक 17.81 रुपयेवरून 2,017.10 रुकायेपर्यंत वाढला आहे. बाजारातील तज्ज्ञ आणि गुंतवणूकदार या शेअरवर अतिशय उत्साही आणि सकारात्मक असून ते गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. ब्रोकरेज हाऊस एडलवाईसच्या मते, ह्या शेअर्स ची किंमत पुढील काळात 3,127 रुपयेपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच, सध्याच्या ट्रेडिंग किमतीपासून हा स्टॉक तब्बल 50 टक्के वाढू शकतो.

दलालांचे मत काय?
गुजरातमधील नंदेसरी येथील कंपनीच्या एका प्लांटमध्ये जबरदस्त आग लागली होती, या अपघातामुळे कंपनीला खूप तोटा झाला होता. पण आता कंपनी रिकव्हरीच्या दिशेने वाटचाल करत आहे. हा प्लांट आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे. कंपनीने नुकतेच आपल्या जून 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. जून तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात वार्षिक आधारावर 36 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. तर वार्षिक आधारावर 22 टक्के नफा घसरला आहे. आर्थिक वर्ष 2022 साठी कंपनीच्या उद्योग विस्तारसाठी सुमारे 15 अब्ज रुपये गुंतवणूक करण्याची योजना आहे. त्यामुळे येत्या काही काळात शेअर्समध्ये जबरदस्त वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रति शेअर 3,127 रुपये लक्ष्य किंमत :
एडलवाईसने या रासायनिक क्षेत्रातील या स्टॉकवर 3,127 रुपये प्रति शेअर एवढी लक्ष्य किंमती जाहीर केली आहे. यासह त्याचे ‘बाय’ (खरेदी) रेटिंग कायम ठेवले आहे. चालू वर्ष 2022 मध्ये दीपक नायट्रेट कंपनीचे शेअर्स आतापर्यंत तब्बल 20 टक्के खाली ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या स्टॉकमध्ये तब्बल11.38 टक्के वाढ पाहायला मिळाली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Penny Stocks Deepak nitrate share price return on 12 August 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Penny Stock(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x