25 April 2024 3:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी
x

Vivo V25 Pro | विवोचा लेटेस्ट स्मार्टफोन 17 ऑगस्टला लाँच होणार, किंमत आणि जबरदस्त फीचर्स जाणून घ्या

Vivo V25 Pro

Vivo V25 Pro Smartphone | जर तुम्ही 35 हजार ते 45 हजार रुपयांदरम्यानचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. विवोचा लेटेस्ट स्मार्टफोन लवकरच लाँच होणार आहे, ज्याची किंमत या रेंजमध्ये असल्याचा अंदाज आहे. व्ही सीरिजचा विवो V25 प्रो स्मार्टफोन १७ ऑगस्ट रोजी भारतात लाँच होणार आहे. कंपनीने नुकतीच ही माहिती दिली आहे.

मीडियाटेक डायमेन्शन १३०० प्रोसेसर असलेला हा फोन परफॉर्मन्सच्या बाबतीत खूप चांगला असण्याची शक्यता आहे. हा प्रोसेसर माली-जी ७७ एमसी९ जीपीयूसोबत जोडला जाईल. माहितीनुसार, चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या विवो एस १५ प्रो फोनचे रिब्रँडेड व्हर्जन भारतात लाँच केले जाणार आहे.

येथून खरेदी करू शकाल :
विवो एस १५ प्रो फोन खरेदी करण्यासाठी अनेक पर्याय मिळतील. ऑनलाइन स्टोअर फ्लिपकार्ट व्यतिरिक्त ग्राहकांना हा फोन विवो स्टोअर आणि जवळच्या ऑफलाईन रिटेल स्टोअरमधूनही खरेदी करता येणार आहे. हा फोन १७ ऑगस्टपासून भारतातील ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही स्टोअर्सवर उपलब्ध होणार आहे.

विवो एस १५ प्रो फोन हा डिझाइन सेंट्रिक फोन आहे. विवो एस १५ प्रो फोनमध्ये कर्व्ड डिस्प्ले असेल आणि फ्लोराइट एजी ग्लास मिळेल. या विवो फोनचा मॉडेल नंबर व्ही २१५८ असून याचे कलर चेंजिंग बॅक पॅनल फीचर व्ही २३ फोनसारखेच असणार आहे.

विवो एस १५ प्रो फोनमध्ये ८ जीबी पर्यंत एक्सटेंडेड रॅम असेल. मीडियाटेक डायमेन्शन १३०० प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असणार आहे. ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सपोर्टसह ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असेल. विवो कंपनीने म्हटले आहे की, फोनची स्क्रीन १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट असेल.

या फोनमध्ये ४८३० एमएएचची दमदार बॅटरी तसेच ६६ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल, जेणेकरून तो अगदी कमी वेळात चार्ज करता येईल. हा फोन ब्लू आणि ब्लॅक अशा दोन कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. ब्लू कलर व्हेरियंटमध्ये रंग बदलण्याची क्षमता असेल. या किंमतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र भारतात या फोनची किंमत जवळपास 40 हजार रुपयांपासून सुरु होईल असा अंदाज आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Vivo V25 Pro smartphone price on Flipkart check details 13 August 2022.

हॅशटॅग्स

#Vivo V25 Pro Smartphone(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x