19 April 2024 11:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत महिना SIP करा, हमखास 12 लाख रुपये परतावा मिळेल BYD Atto 3 | खुशखबर! आता BYD Atto 3 ई-कारला नो वेटिंग, झटपट डिलिव्हरी मिळणार, प्राईससह फीचर्स जाणून घ्या ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील
x

Mutual Funds | 3 वर्ष SIP करून मिळाला 7.5 लाख रुपयांचा परतावा, जाणून घ्या गुंतवणुकीचे सर्व तपशील आणि निवडा योग्य फंड

Mutual Funds

Mutual Funds | आजकाल लोकांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याला खूप पसंती दिली आहे. म्युच्युअल फंडात छोटी रक्कम एसआयपी गुंतवणूक करून तुम्ही भरघोस परतावा कमवू शकता. असाच एक म्युचुअल फंड आहे, जो आपल्या गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा कमावून देत आहे. क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅनने मागील वर्षी आपल्या गुंतवणूकदारांना 12.24 टक्केचा परतावा कमावून दिला होता. वर्षातील काही महिने सोडले तर या म्युचुअल फंडाने दिलेला वार्षिक सरासरी परतावा 15.48 टक्के पेक्षा अधिक राहिला आहे.

आजच्या महागाईच्या काळात प्रत्येक व्यक्ती आपली गुंतवणुकीची पारंपरिक पद्धत बदलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, आणि भरघोस परतावा कमावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक करत आहे. बँक एफडी, एलआयसी, पोस्ट ऑफिस हे जोखीममुक्त गुंतवणुकीचे पर्याय बाजारात उपलब्ध आहेतच, ज्यात लोकांना हमखास परतावा मिळतो. तुम्हालाही तुमचा पोर्टफोलिओ प्रोफीटेबल करायचा असेल तर म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करून तुम्ही चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा कमवू शकता.

SIP वर भरघोस परतावा :
अनेक आर्थिक आणि म्युचुअल फंड तज्ञ आपल्या ग्राहकांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा आग्रह करत असतात. आज आम्ही तुम्हाला या लेखात अशा काही म्युच्युअल फंड योजनेची माहिती देणार आहोत, ज्यात गुंतवणूक करून फक्त तीन वर्षांत गुंतवणूकदारांनी भरघोस परतावा कमावला आहे. मासिक 10,000 रुपयेच्या SIP गुंतवणुकीवर तीन वर्षात 7.5 लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे. ह्या म्युच्युअल फंडचे नाव आहे, क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन. या म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 3 वर्षांत 54 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळाला आहे. जानेवारी 2013 मध्ये क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅन हा म्युच्युअल फंड लॉन्च करण्यात आला होता. या म्युचुअल फंडाला व्हॅल्यू रिसर्चने 4 स्टार रेटिंग दिले आहे, तर दुसरीकडे, मॉर्निंग स्टारने या फंडाला 5 स्टार रेटिंग दिले आहे.

गुंतवणुकीवर मिळणारा परतावा :
क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅनने मागील वर्षी आपल्या गुंतवणूकदारांना 12.24 टक्के परतावा मिळवून दिला होता . वर्षातील पडझडीचे आणि अस्थिरतेचे काही महिने वगळता या म्युचुअल फंडाने दिलेला वार्षिक सरासरी परतावा 15.48 टक्के पेक्षा अधिक होता. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक केली असती, तर तुम्हाला 10,000 रुपयांच्या SIP गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज पद्धतीने 14 लाख रुपयांचा मजबूत परतावा मिळाला असता. ह्या परताव्याचे टक्केवारीत प्रमाण अंदाजे 34.71 टक्के आहेत. त्याच वेळी जर तुम्ही मासिक 10,000 रुपये तीन वर्षासाठी SIP पद्धतीने गुंतवणुक केली असती, तर तुम्हाला एकूण 7.5 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता.

वार्षिक परतावा :
अशा परिस्थितीत, वार्षिक परताव्याच्या टक्केवारीचे निरीक्षण केले तर असे दिसेल की, ह्या म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी तब्बल 54.13 टक्के नफा कमावला आहे. दुसरीकडे, मागील दोन वर्षांच्या परताव्याचे निरक्षण केले तर असे दिसेल की, ह्या म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 36.68 टक्के परतावा मिळाला आहे. तुम्ही जर 10,000 रुपये मासिक SIP पद्धतीने गुंतवणूक केली तर, एका वर्षात तुम्हाला 3.5 लाख रुपये परतावा मिळू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual funds Quant Small Cap Fund Direct Growth Plan check details 19 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x