19 April 2024 2:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

शिंदे-फडणवीस सरकारचा महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुणांना अजून एक धक्का | मुंबईतील सरकारी कामासाठी चेन्नईमध्ये मुलाखती

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray ​​| युवासेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज राज्यातील शिंदे सरकारवर प्रकल्पांबाबत घणाघाती आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत आरोप करताना त्यांनी वेदांता-फॉक्सकॉनमुळे राज्याचं किती नुकसान झालं याची आठवण करुन दिली. बल्कड्रग पार्कही राज्याबाहेर गेल्याने किती रोजगार गेले याची देखील आठवण करुन दिली, पण आदित्य ठाकरे यावरच थांबले नाहीत.

आदित्य ठाकरे यांनी वर्सोवा ब्रांद्रा सी लिंकविषयी सर्वात मोठा आरोप राज्य सरकारवर केला आहे. राज्याच्या बाहेर प्रकल्प जाणे या विषय वेगळा,पण राज्यात जे प्रकल्प राबवले जात आहेत, त्याच्या मुलाखतींची जाहिरात ही इतर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये दिली जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

काय म्हटलं आहे आदित्य ठाकरेंनी :
वांद्रे-अंधेरी सी लिंकचं काम हे मुंबईत सुरू आहे, पण या कामासंबंधी मुलाखती मात्र चेन्नईमध्ये घेतल्या जात आहेत, त्यामुळे भूमीपुत्रांचं काय असा सवाल शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरेंनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजकारणापेक्षा विकास कामांवर लक्ष द्यायला हवं अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, “आज मी कोणत्याही राजकीय विषयावर बोलणार नाही. महाराष्ट्राच्या दृष्टीने आज रोजगार आणि विकासाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. वांद्रे- अंधेरी सी लिंकचा प्रकल्प हा मुंबईमध्ये होणार आहे.पण त्यासाठी येत्या रविवारी चेन्नईमध्ये मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे भूमीपुत्रांच्या हक्काचं काय असा प्रश्न निर्माण होतोय. मला चेन्नई किंवा गुजरातवर आक्षेप नाही, पण काम जर मुंबईत असेल तर मग केवळ चेन्नईमध्ये मुलाखती का? त्याचसोबत मुंबई, ठाणे, संभाजीनगर या सारख्या शहरातही मुलाखती व्हाव्यात.” अशीही मागणी त्यांनी केली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Yuvasena leader Aaditya Thackeray serious allegations on Shinde Government check details 21 September 2022.

हॅशटॅग्स

#Aaditya Thackeray(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x