19 April 2024 9:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Multibagger Stocks | हा स्टॉक मंदीतही पैसा वेगाने वाढवतो, तज्ञांनी दिली टार्गेट प्राईस, टॉप ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला

Multibagger Stocks

Multibagger Stock| 2008 हे वर्ष जागतिक आर्थिक मंदीमुळे ओळखले जाते. आजपासून सुमारे 14 वर्षांपूर्वी, 2008 साली जगात आर्थिक मंदीच्या सावट होते. या भयानक आर्थिक मंदीने संपूर्ण जगाची, आणि विकसित देशांची ही अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली होती. जगभरातील कोट्यवधी लोकांना बेरोजगार व्हावे लागले होते. आपल्या मेहनतीचे पैसे गमवावे लागले होते. पण अश्या आर्थिक मंदीमध्ये भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध झालेला असा एक शेअरही होता ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना साथ दिली.

त्या आर्थिक मंदीच्या काळात ज्या लोकांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती, ते लोक आज करोडपती झाले आहेत.आज या लेखात आम्ही तुम्हाला अश्या एका मिड-कॅप आयटी स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत, जो मागील 14 वर्षांपासून दर चार वर्षांनी आपल्या भागधारकांची गुंतवणूक दुप्पट करतो. ह्या शेअरचे नाव आहे,.कोफोर्ज. Coforge कंपनीचा हा असा स्टॉक आहे, जो 2008 च्या आर्थिक मंदीत ही आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत होता.

Coforge शेअरचा इतिहास – Coforge Stock Price :
मार्च 2008 मध्ये Coforge च्या शेअरची किंमत प्रति शेअर 90 रुपये होती. चार वर्षानंतर मार्च 2012 मध्ये शेअरची किंमत 190 रुपये झाली. या काळात आयटी पोझिशनल भागधारकांनी 100 टक्क्यांहून अधिक परतावा कमावला होता. नंतर, मार्च 2016 मध्ये पुन्हा, कोफोर्जच्या शेअरची किंमत 460 रुपये पर्यंत वाढली.म्हणजेच,परत चार वर्षानी ह्या स्टॉकच्या गुंतवणूकदारांनी 140 टक्के परतावा कमावला होता. पुढील काळात या मिड-कॅप आयटी स्टॉकची किंमत मार्च 2020 मध्ये वाढून 1,790 वर जाऊन पोहोचली होती. या 4 वर्षांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी 290 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावला होता.

कोफोर्जची सध्याची किंमत :
BSE निर्देशांकात ह्या स्टॉकची किंमत 6,133 रुपये या सर्वकालीन उच्चांकी पातळीवर गेली आहे. यामुळे या कालावधीत त्याने आपल्या गुंतवणूकदारांनी 100 टक्क्यांहून अधिक परतावा कमावला आहे. तथापि, रशिया-युक्रेन युद्धानंतर कॉफोर्ज शेअरची किंमत थोडी घसरली असून सध्या त्याची किंमत 3,340 रुपयांपर्यंत खाली आली आहे. BSE निर्देशांकावर ह्या स्टॉकची किंमत मार्च 2020 च्या किमतीच्या तुलनेत 86 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. जर तुम्ही 2008 मध्ये कॉफोर्जच्या शेअरमध्ये 90 रुपये किमतीचे 1 लाख रुपयेचे शेअर्स खरेदी केले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 36.93 लाख रुपये झाले असते.

टार्गेट प्राईस :
कोफोर्ज कंपनीचे शेअर्स पुन्हा उसळी घेतील असा अंदाज शेअर बाजारातील तज्ञ आणि गुंतवणूकदार व्यक्त करतात. “डिसेंबर 2021 मध्ये कोफोर्जच्या शेअर्सने BSE निर्देशांकावर 6133 रुपये हा आपला सर्वकालीन उच्चांक गाठला होता. सध्या शेअरची किंमत पडली आहे,त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदार हे खरेदी करू शकतात. पुढील 12 महिन्यांत स्टॉकची किंमत 4,000 रुपयेवर जाऊ शकते. 3,000 च्या खाली स्टॉप लॉस लावून 3,100 ते 3,150 च्या किमतीवर खरेदी करा, आणि 4000 ही टार्गेट प्राईस लक्षात ठेवा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of CoForge Limited share gives double return in every four years on 26 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x