20 April 2024 5:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

Railway Ticket Booking | तुम्ही पॅसेंजर ट्रेनने गावी किंवा फिरायला जाताना रात्रीचा प्रवास करता?, रेल्वेने नियम बदलले, लक्षात ठेवा अन्यथा..

Railway Ticket Booking

Railway Ticket Booking | ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. जर तुम्हीही ट्रेनने लांबचा प्रवास करण्याचा विचार करत असाल, म्हणजेच तुम्हीही रात्री प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आता रात्री प्रवास करण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. अनेक वेळा रात्रीच्या प्रवासात प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे यावर मात करण्यासाठी रेल्वेने नियमात बदल केला आहे.

रेल्वेने कोणते नियम बनवले :
अनेक वेळा ट्रेनमध्ये रात्री प्रवास करताना तुम्ही तुमच्या आजूबाजूला मोबाईलवर मोठ्याने बोलता किंवा चित्रपट आणि गाणी वाजवता, ज्यामुळे आजूबाजूचे लोक खूप अस्वस्थ होतात, मग अशा समस्यांवर मात करण्यासाठी रेल्वेने खास निर्णय घेतला आहे.

दंड आकारला जाईल :
यापुढे रात्रीच्या वेळी प्रवास करताना जर कोणी असे कृत्य केलं तर त्याला दंड ठोठावण्यात येईल, असं रेल्वेनं म्हटलं आहे. रात्री झोपताना डब्यात आत-बाहेर आवाज करणे, डब्यातील इतर लोकांशी मोठ्याने बोलणे, मोठ्या आवाजात संगीत वाजवणे किंवा कॉलवर बोलणे, अशा प्रकारे लोकांना त्रास देणाऱ्यांविरोधात रेल्वेकडून जबर दंड आकारण्यात येणार आहे.

इअरफोन्ससह पाहू शकता चित्रपट :
रेल्वेच्या नियमानुसार इअरफोन लावून तुम्ही सिनेमा पाहू शकता किंवा गाणी ऐकू शकता, पण इअरफोनशिवाय असं कोणतंही काम करता येत नाही. प्रवाशांना सहज झोपता यावी आणि विनाअडथळा प्रवास करता यावा यासाठी रेल्वेने हा नवा नियम आणला आहे.

टीटीईला डिस्टर्ब करू शकणार नाही :
अनेक वेळा असे होते की, ट्रॅव्हल तिकीट एक्झामिनर (टीटीई) रात्री उशिरा येऊन प्रवाशाला उठवून तिकीट किंवा आयडीबाबत विचारणा करतो. माहितीनुसार, रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत टीटीई तुम्हाला डिस्टर्ब करू शकत नाही. सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेतच तिकिटांची पडताळणी करता येणार आहे. रेल्वे बोर्डाच्या गाईडलाईन्सनुसार टीटीईसुद्धा झोपताना तुमचं तिकीट तपासू शकत नाही. मात्र, रात्री दहानंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हा नियम लागू होत नाही. रात्री 10 नंतर तुम्ही ट्रेनमध्ये बसलात तर तिकीट आणि आयडी जरूर चेक करा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Railway Ticket Booking for night travel rules changed check details 27 September 2022.

हॅशटॅग्स

#Railway Ticket Booking(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x