19 April 2024 4:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

IPO Investment | आयपीओत 15 हजारांपेक्षा कमी गुंतवणूक करून मोठा नफा कमाईची संधी, गुंतवणूक करा, स्टॉकची यादी पाहा

IPO investment

IPO Investment | शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी जर तुम्ही नवीन IPO येण्याची वाट पाहत असाल तर आजपासून तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. 27 सप्टेंबरपासून तीन कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले केले जाणार आहेत.त्यातील एक कंपनी ऑफर फॉर सेल साठी IPO घेऊन येणार आहे. IPO मध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा कमवू शकता, आणि झालेल्या नुकसानीची भरपाई देखील करू शकता. IPO मध्ये गुंतवणूक करून नफा कमावणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

परंतु काही वेळा IPO मध्ये पैसे लावल्याने गुंतवणूकदारांचे खूप मोठे नुकसानही होते, जसे की ZOMATO, LIC, असे भरपुर IPO आले होते, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना निराश केले आहेत. अशा परिस्थितीत, कोणता IPO गुंतवणुकीसाठी चांगला आहे आणि कोणत्या IPO पासून लांब राहावे, हे तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घेऊ शकता. योग्य IPO मध्ये गुंतवणूक करून तुम्ही प्रीमियम लिस्टिंगमधून चांगला नफा कमवू शकता.त्यासाठी नेहमी IPO मध्ये गुंतवणूक करताना तज्ञाचां सल्ला घ्यावा.

Indong Tea Company Ltd :
इंडोंग टी कंपनी लि ही कंपनी चहाच्या व्यवसायात गुंतलेली आहे. या कंपनीचा IPO 27 सप्टेंबर 2022 पासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. IPO मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे. या कंपनीची इश्यू ऑफर किंमत म्हणजेच प्राइस बँड 26 रुपये असून IPO इश्यूचा आकार 6.83 कोटी रुपये असेल.

Cyber Media Research & Services Ltd :
सायबर मीडिया रिसर्च अँड सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा IPO 27 सप्टेंबर 2022 गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. ही कंपनी IPO च्या माध्यमातून ऑफर फॉर सेल घेऊन आली आहे. ह्या कंपनीने त्याची शेअर्सची इश्यू ऑफर किंमत 171-180 रूपये दरम्यान निश्चित केली आहे. IPO ची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2022 असेल.

Concord Control Systems Ltd :
या कंपनीने बाजारात आपला IPO 27 सप्टेंबर 2022 पासून गुंतवणुकीसाठी खुला केला आहे. तुम्ही या IPO मध्ये 29 सप्टेंबर पर्यंत बोली लावू शकता. त्याच्या कंपनीने आपल्या शेअर्सची इश्यू किंमत 53 ते 55 रुपयांच्या दरम्यान निश्चित केली आहे. IPO इश्यूचा एकूण आकार 8.32 कोटी रुपये असेल.

Cargotrans Maritime Ltd :
कार्गोट्रान्स मेरीटाईम लिमिटेड कंपनीचा आयपीओ 27 सप्टेंबर 2022 पासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्याची IPO इश्यू किंमत 45 रुपये प्रती शेअर निश्चित करण्यात आली आहे. IPO मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2022 असेल. हा IPO इश्यू 4.86 कोटी रुपयांसाठी असेल. या 2022 या चालू वर्षात जवळपास 53 IPO शेअर बाजारात लाँच होतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IPO investment opening for raising funds from market has been initiated for bid on 28 September 2022.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)IPO return(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x