29 March 2024 1:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

Multibagger Stocks 2022 | 2022 मध्ये हे 37 शेअर्स 100 ते 250 टक्के परतावा देत पैसा वेगाने वाढवत आहेत, या स्टॉकची लिस्ट सेव्ह करा

Multibagger Stocks

Multibagger Stocks 2022 | 2022 वर्षाच्या सुरुवातीपासूनच भारतीय भांडवली बाजारासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. महागाई, कोविड 19, आंतरराष्ट्रीय राजकीय तणाव, चलन दरवाढ आणि जागतिक मंदीची भीती यासारख्या अनेक घटकांनी शेअर बाजारात अस्थिरता निर्माण केली आहे. दरम्यान, भारतीय शेअर बाजारांची कामगिरी इतर जागतिक बजारतच्या तुलनेत खूप चांगली राहिली आहे. मागील 9 महिन्यांत सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांत 1.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. या काळात शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या भागधारकांना कमालीचा परतावा कमावून दिला आहे.

Sensex आणि Nifty मध्ये पडझड :
2022 मध्ये आतपर्यंत Sensex मध्ये 730 अंकांची म्हणजेच 1.26 टक्क्यांची घसरण झाली आहे. या दरम्यान, Sensex मधील 30 पैकी 17 शेअर्स लाल रंगात ट्रेड करत होते. Nifty मध्ये 229 अंकांची म्हणजेच 1.32 टक्के घसरण झाली असून 50 पैकी 27 शेअर्स लाल रंगात ट्रेड करत आहेत. BSE मिडकॅप इंडेक्समध्ये 1 टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे, तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 3.5 टक्‍क्‍यांची घसरण दिसून आली आहे. BSE500 निर्देशांकही 1 टक्क्यांपेक्षा थोडा जास्त घसरला आहे.

बँक शेअर्स वाढले, आयटी घसरले :
2022 या चालू वर्षाच्या 9 महिन्यांत बँक निर्देशांकांत 9 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. आयटी निर्देशांक तब्बल 30 टक्क्यांनी खाली पडला आहे. FMCG निर्देशांकांत 17 टक्के वाढ झाली असून, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 9 टक्के वाढला आहे. PSU निर्देशांकांत 7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. ऑटो इंडेक्स निर्देशांकात 17 टक्क्यांची वाढ झाली असून, मेटल इंडेक्स 6 टक्के पडला आहे. ऑइल अँड बेस आणि पॉवर स्टॉक मध्ये कमालीची वाढ दिसून आली आहे.

2022 : सर्वात जास्त परतावा नोंदवणारे स्‍मालकॅप स्टॉक
* TGV Sraac : 236 टक्के
* वाडीलाल इंडस्‍ट्रीज : 177 टक्के
* मिर्जा इंटरनेशनल : 164 टक्के
* फिनोटेक्‍स केमिकल : 154 टक्के
* D B Realty : 133 टक्के
* CPCL : 129 टक्के
* शांति गियर्स : 125.टक्के
* Himadri Special : 121 टक्के
* वेस्‍ट कोस्‍ट पेपर : 109 टक्के
* आंध्रा पेपर : 101 टक्के

2022 : सर्वात जास्त परतावा देणारे टॉप माइक्रोकॅप स्‍टॉक
* Shri Venkatesh : 242 टक्के
* TCPL पैकेजिंग : 127 टक्के
* Markolines Traf : 123 टक्के
* Diamines & Chem : 105 टक्के
* Clara Industries : 92 टक्के
* जिंदल ड्रिलिंग : 89 टक्के
* लिबर्टी शूज : 83 टक्के

2022 : सर्वाधिक परतावा देणारे मिडकॅप स्टॉक
* BLS इंटरनॅशनल : 204 टक्के
* दीपक फर्टिलायझर्स : 136 टक्के
* भारत डायनॅमिक्स : 125.टक्के
* शॉपर्स स्टॉप : 124 टक्के
* श्रीरेणुका शुगर : 97 टक्के
* महिंद्रा लाइफ : 94 टक्के

2022 : अप्रतिम परतावा देणारे टॉप शेअर/निफ्टी-50
* ITC: 53 टक्के
* M & M: 52 टक्के
* COAL इंडिया : 46 टक्के
* आयशर मोटर्स : 42 टक्के
* IndusInd Bank : 33 टक्के
* NTPC : 29 टक्के

2022 : सर्वाधिक परतावा नोंदवलेले लार्ज कॅप स्टॉक
* अदानी पॉवर : 275 टक्के
* अदानी एंटरप्रायझेस : 104 टक्के
* मेट्रो ब्रँड : 98 टक्के
* अदानी टोटल गॅस : 94 टक्के
* हिंदुस्तान एरोनॉटिक्स : 93 टक्के
* अदानी ट्रान्समिशन : 90 टक्के
* फाइन ऑरगॅनिक्स : 87 टक्के
* इंडियन हॉटेल्स : 83 टक्के

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of 2022 which has given Amazing returns to shareholders in short time on 1 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x