19 April 2024 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर Reliance Power share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स पॉवर शेअर होल्ड करावा की बाहेर पडावे? Samvardhana Motherson Share Price | 18 पैशाच्या शेअरची जादू! गुंतवणुकदार झाले करोडपती, पुढेही फायद्याचा स्टॉक Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला Infosys Share Price | भरवशाचे टॉप 7 शेअर्स स्वस्त झाले, पण व्हॉल्यूम लाखोमध्ये, संयम राखल्यास मिळेल मल्टिबॅगर परतावा IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, सर्किट फिल्टरही वाढला, स्टॉक तुफान तेजीत येणार?
x

भारत पाक सीमेवर तणाव वाढतो आहे, पाककडून युद्ध सदृश्य जमवाजमव

India, Pakistan, Pakistan Zindabad, Pulawama Attack

जम्मू काश्मीर: पुलवामा जिल्ह्यात दहशवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापार्श्वभूमीवर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये युद्ध सदृश्य जमवाजमव सुरु असून, पश्चिम सीमेवरून पाकिस्तानी सैन्य कमी करून ते जम्मू-काश्मीरजवळच्या पूर्व सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारत-पाक सीमेवर युद्धाचे ढग तयार झाल्याचे वातावरण आहे, एएनआयने यासंबंधी अधिकृत वृत्त दिले आहे.

पाकिस्तानचे त्यांच्या ठराविक सहकारी देशांशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे जर ताणावाच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी तसेच उद्रेकाची स्थिती निर्माण झाल्यास त्यांची तडकाफडकी मदत घेण्यात येईल, असे पाकिस्तानच्या राजकीय सुत्रांनी म्हटल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. दरम्यान, पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यानंतर काही तासांपूर्वीच जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शत्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार करण्यात आला. तसेच याला भारताकडून सडेतोड उत्तर देण्यात आले. परंतु, त्यानंतर भारताने सैन्याने जमवाजमव सुरु केल्यानंतर पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामध्ये ते म्हणाले, आम्ही स्वतःहून कुठलीही तयारी करत नाही, परंतु तुम्ही युद्धासाठी तयारी करीत असाल तर त्याला उत्तर देण्याचा अधिकार आम्हाला आहे, युद्धासंबंधीचे असे सूचक विधान देखील त्यांनी केले होते.

भारत पाकिस्तान या दोन्ही देशांतील युद्धाच्या शक्यतेबाबत गफूर म्हणाले की, या दोन्ही देशांमध्ये युद्ध व्हावे अशी आमची इच्छा नाही. भारत आम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकत नाही उलट आम्हीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतो, त्यामुळे भारताने पाकिस्तानशी वाद घालू नये, असा चिथावणीचा इशाराच गफूर यांनी भारताला दिला आहे.

हॅशटॅग्स

#India Pakistan Relation(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x