29 March 2024 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला
x

Top Mutual Funds | टॉप म्युच्युअल फंडाची लिस्ट, गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटीने वाढवत आहेत, तुम्ही सुद्धा पैसे वाढवा

Top Mutual fund

Top Mutual Funds | आजकाल आपल्याला गुंतवणुकीची अनेक माध्यमे उपलब्ध आहेत, आणि आपण वेगवेगळ्या माध्यमांमध्येही गुंतवणूक करत असतो. त्याच वेळी, म्युच्युअल फंड हा देखील एक गुंतवणुकीचा चांगला पर्याय मानला जातो. म्युच्युअल फंडामध्ये आपण एकरकमी किंवा SIP पद्धतीने ठराविक काळानुसार गुंतवणूक करत असतो. म्युच्युअल फंड योजना या बाजारातील जोखमीच्या अधीन असतात. बहुतेक लोकांना तर म्युच्युअल फंडातील जोखमींबद्दल माहिती सुध्दा नसते. तथापि, म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करून आपण विशिष्ट कालावधीत भरघोस परतावा प्राप्त करू शकतो. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा पाच इक्विटी म्युच्युअल फंडांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षांत श्रीमंत केले आहे.

5 सर्वोत्तम इक्विटी म्युच्युअल फंड :

कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंड :
AMFI डेटानुसार, हा म्युचुअल फंड मागील 5 वर्षात अप्रतिम परतावा देणारा लार्ज कॅप इक्विटी म्युच्युअल फंड आहे. कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 15.03 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या नियमित योजनेतून लोकांनी 5 वर्षांत 13.48 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावला आहे. हा म्युचुअल फंड S&P BSE 100 निर्देशांकाला फॉलो करतो, ज्याने मागील पाच वर्षांमध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमवून दिला आहे. या योजनेत “खूप उच्च” जोखीम आहे, असे मानले जाते.

Axis Bluechip Fund :
Axis Bluechip Fund डायरेक्ट प्लॅनने आपल्या गुंतवणुकदारांना 14.16 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे. तर या योजनेच्या नियमित प्लॅनने गेल्या 5 वर्षात लोकांना 12.75 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे. हा म्युचुअल फंड S&P BSE 100 निर्देशांकाला फॉलो करतो. गेल्या 5 वर्षांत या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना 13 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेत जोखीम “खूप उच्च” आहे.

एडलवाईस लार्ज कॅप फंड :
एडलवाईस लार्ज कॅप फंडाच्या डायरेक्ट ग्रोथ प्लॅनने गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 13.25 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या नियमित प्लॅन गेल्या 5 वर्षांत लोकांना सरासरी वार्षिक 11.76 टक्के परतावा कमावून दिला आहे. हा म्युचुअल फंड निफ्टी 100 निर्देशांक फॉलो करतो. या म्युचुअल फंडने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरारी वार्षिक 12.8 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेत जोखीम “खूप उच्च” आहे.

कोटक ब्लूचिप फंड :
कोटक ब्लूचिप म्युचुअल फंडाच्या डायरेक्ट ग्रोथ प्लॅनने आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वर्शिक 13.24 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या नियमित पलं मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 11.91 टक्के परतावा कमावून दिला आहे. हा म्युचुअल फंड निफ्टी 100 निर्देशांक फॉलो करतो, आणि मागील 5 वर्षांत या म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करून लोकांनी 12.8 टक्के परतावा कमावला आहे. या म्युचुअल फंड योजनेत जोखीम “खूप उच्च” आहे.

UTI Mastershare Fund :
UTI Mastershare Fund च्या डायरेक्ट ग्रोथ प्लॅनने आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 13.23 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या नियमित प्लॅनने गेल्या 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदाराना सरासरी वार्षिक 12.23 टक्के परतावा मिळवून दिला आहे. हा म्युचुअल फंड S&P BSE 100 निर्देशांक फॉलो करतो. मागील 5 वर्षांत या म्युचुअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 13 टक्के परतावा मिळाला आहे. या म्युचुअल फंड योजनेत जोखीम “खूप उच्च” आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of Top Mutual fund for investment and earning Huge return in Long term on 31 October 2022

हॅशटॅग्स

Top Mutual fund(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x