23 April 2024 11:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा EPF Money Withdrawal | पगारदारांनो! EPF खात्यातून पैसे काढल्यावरही टॅक्स भरावा लागणार, कधी आणि किती ते लक्षात ठेवा Numerology Horoscope | 23 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 23 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

अर्णब गोस्वामी! बातमीचं वृत्तांकन करताना जरा ताळतंत्र बाळगा: आनंद महिंद्रा

Indian Industrialist Aanand Mahindra, Arnab Goswami

मुंबई : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाईदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची पाकिस्तान सुटका करणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक संसदेत केली. सदर वृत्तानंतर देशभरात आनंद व्यक्त करण्यात वातावरण पसरलं आहे. परंतु, मागील काही दिवसांत भारतीय वृत्तवाहिन्यांनी पुलवामा आणि विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या ताब्यात असतानाचं केलेलं वृत्तांकन अनेकांच्या पचनी पडलेलं नाहीये. भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध भारतीय प्रसारमाध्यमांनाच हवं आहे, त्यामुळे या वाहिन्यांवर निर्बंध घालावेत अशी मागणी देखील समाज माध्यमांवरून होताना दिसते आहे.

दरम्यान, याच मागणीचा संदर्भ देत प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी, रिपब्लीक टिव्हीच्या ट्विटर हँडलवर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना, ‘बातमीचं वृत्तांकन करताना जरा ताळतंत्र बाळगा’ असा सल्ला पत्रकार अर्णब गोस्वामी यांना दिला आहे.

मी सहसा कोणत्याही प्रसारमाध्यमांच्या धोरणांवर मत व्यक्त करत नाही. मात्र प्रसारमाध्यमांनी अभिनंदन भारतात सुखरुप परतण्याच्या प्रक्रियेमध्ये खोडा घातला जाईल असं वृत्तांकन करता कमा नये. अर्णब आपण वृत्तांकन करताना ताळतंत्र बाळगायलाच हवं…अशा आशयाचा संदेश देत महिंद्रा यांनी प्रसारमाध्यमांचे कान टोचले आहेत.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x