25 April 2024 11:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन असं बोलून समस्त महिलांचा अपमान केल्यांनतरही सत्ताधारी शांत, पण महिला आयोग आक्रमक

Sambhaji Bhide

Sambhaji Bhide | ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते. शिंदेंसोबतच्या भेटीनंतर संभाजी भिडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना या भेटीचं कारण स्पष्ट केलं होतं. मुख्यमंत्री झाल्यापासून मी त्यांची भेट घेतली नव्हती. त्यामुळे ही सदिच्छा भेट देण्यासाठी आलो आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी माध्यमांना दिली होती.

या भेटीबाबात बोलताना ते म्हणाले होते, “मी राष्ट्रहिताच्या काही मुद्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र, मंत्रीमंडळाची बैठक असल्याने सविस्तर चर्चा झाली नाही. त्यामुळे आगामी काळात त्यांची पुन्हा भेट घेणार आहे”, अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली होती. या भेटीचे काही राजकीय अर्थ काढले जात असल्याबाबात विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारचे कौतुक केले. मात्र काही वेळातच त्यांनी एका मंत्रालयातच एका महिला पत्रकाराचा टिकली न लावण्यावरून अपमान केला आणि राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला आणि त्याविरोधात अजून टीका होतं आहे. विशेष म्हणजे यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी प्रतिक्रिया देणं अपेक्षित असताना त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे हे सामान्य जनतेचं सरकार असल्याचं सांगणारे सत्ताधारी सामान्य महिलांबाबत किती प्रगत विचारांचे आहेत याचा अप्रत्यक्ष प्रत्यय येताना दिसत आहे.

दरम्यान, वादग्रस्त वक्तव्यामुळे महिला आयोग आक्रमक झाला आहे. संभाजी भिडे यांनी सदर वक्तव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश महिला आयोगामार्फत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर यावर प्रतिक्रिया देण्यासाठी सर्व पत्रकार भिडे गुरुजींकडे गेले. यावेळी एका महिला पत्रकार त्यांची प्रतिक्रिया विचारायला गेली. तिला पाहून संभाजी भिडे म्हणाले, आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन. आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमाता आहे. भारतमाता विधवा नाहीये.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sambhaji Bhide statement on Bindi Tikli insulting a woman journalist check details 03 November 2022.

हॅशटॅग्स

#Sambhaji Bhide(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x