20 April 2024 5:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

मोदी म्हणतात २६/११च्या हल्ल्यानंतर काय केलं? बहुतेक मोदींना नौदल, NSG कमांडो व मुंबई पोलिसांच्या शौर्याचा विसर?

Narendra Modi. 26/11 Attack On Mumbai, Pakistan

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटे पाक व्याप्त काश्मीरमध्ये एअरस्ट्राइक करून बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केले होते. दरम्यान, सदर कारवाईत भारतीय प्रसार माध्यमांनी संरक्षण, परराष्ट्र व्यवहार किंवा भारतीय लष्कराकडून कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केली नसताना स्वतःच निरनिराळी आकडेवारी जाहीर करण्याची स्पर्धा लावली होती.

दरम्यान, सदर एअर स्ट्राईकनंतर स्वतःची पाठ थोपटवण्यात व्यस्त असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी २६/११ मधील मुंबईवरील दहशदवादी हल्ल्याचा आधार घेत विरोधकांनी काहीच केलं नसल्याचा आरोप केला आहे. वास्तविक मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात जेव्हा खुलेआम दहशदवादी हल्ला होतो, तेव्हा सामान्यांचा विचार करून कारवाई करणे किती कठीण होते याचा मोदींना अंदाज नसावा. त्यावेळी भारतीय नौदल वेस्टर्न कमांडचे कमांडो, एनएसजी कमांडो आणि मुंबई पोलिसांनी काय बलिदान दिलं होतं आणि दहशतवाद्यांना यमसदनी धाडून अजमल कसाबला मुंबई पोलीस कॉन्स्टेबल शहीद तुकाराम ओंबळे यांनी हातात कोणताही हत्यार नसताना त्याला जिवंत पकडले होते आणि पाकिस्तानला उघडं पाडलं होतं.

तसेच मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशदवादी हल्ल्यातील एकमेव जीवंत दहशतवादी अजमल कसाब याला कोणतीही वाच्यता न करता एका सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी दिली होती. विशेष म्हणजे भारताने कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमांचे आणि भारताच्या कायद्याचे उल्लंघन न करता त्याला फासावर लटकवले होते. तत्पूर्वी, दहशदवादी अजमल कसाबचा दयेचा अर्ज देखील त्यावेळी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी फेटाळला होता. कसाबला विशेष न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातर्फे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ लोक मारले गेले होते तर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि एनएसजी कमांडो देशासाठी शहीद झाले होते. त्यामुळे त्या घटनाक्रमवार प्रश्न उपस्थित करून आणि स्वतःला मोठं दाखवण्यासाठी मोदी त्या शहिदांचा अपमान करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x