18 April 2024 6:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 18 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 4 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 33 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Tinna Rubber Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 3 वर्षात 1 लाख रुपयाच्या गुंवतवणुकीवर दिला 4.42 कोटी परतावा Lorenzini Apparels Share Price | 27 रुपयाच्या शेअरची कमाल, मल्टिबॅगर परताव्यसह स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सचा लाभ Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याची बातमी, सकारात्मक तेजीचे संकेत Stocks To Buy | अल्पवधीत मालामाल होण्याची संधी, हा शेअर देईल 35 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
x

PPF Scheme | PPF योजनेत पैसे गुंतवता, पण खरच तुम्हाला सर्व फायदे माहिती आहेत?, येथे डिटेल जाणून घ्या

PPF scheme

PPF Scheme | जेव्हा आपण सुरक्षित आणि हमखास परतावा देणाऱ्या योजनेची चर्चा करतो, तेव्हा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड PPF योजनेचे नाव सर्वप्रथम आपल्या मनात येते. PPF योजना ही एक सुरक्षित आणि हमखास परतावा देणारी दीर्घकालीन गुंतवणुक योजना आहे. पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा मिळतो. या योजनेत गुंतवणूक करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे आपल्याला आयकरात सूटही मिळते. जर एखाद्या पीपीएफमध्ये नियमित छोटी रक्कम गुंतवणूक करत असाल तर, दीर्घकाळात तुमच्या कडे एक मोठा फंड तयार होऊ शकतो. या योजनेत तुम्ही तुमच्या मुलाच्या किंवा पत्नीच्या नावानेही गुंतवणूक करू शकता. या योजनेतील गुंतवणुकीचा परिपक्वता कालावधी 15 वर्ष निश्चित करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊ पीपीएफ योजनेचे सर्व फायदे आणि व्याजदराबद्दल सर्व तपशील

पीपीएफ मध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया :
पीपीएफ योजना खाते उघडण्यासाठी तुम्ही नजीकच्या कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाणून पीपीएफ खाते उघडण्याचा फॉर्म सबमिट कर्ज शकता. या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती नीट भरा. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने PPF खाते उघडत असाल या फॉर्मसह मुलाचे पालक किंवा कायदेशीर पालक कोण आहे, त्यांचा पासपोर्ट आकाराचा फोटो, केवायसी कागदपत्रे सर्व जमा करावे लागेल. ही सर्व कागदपत्रे फॉर्मसोबत जमा केल्यावर तुमच्या मुलाच्या नावाने पीपीएफ खाते उघडले जाईल. अनेक बँका आपल्या ग्राहकांना घरी बसल्या PPF खाते ऑनलाइन उघडण्याची सुविधा देतात. मात्र यासाठी त्या बँकेत तुमचे खाते असणे आवश्यक आहे.

पीपीएफ खाते उघडण्याचे फायदे :
पीपीएफ खाते उघडण्याचे अनेक फायदे आहेत. समजा तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने एक मोठी रक्कम दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली, तर तुम्हाला त्यावर चक्र वाढ व्याज पद्धतीने परतावा मिळेल. समजा तुमचे मुल सध्या 6 वर्षांचे आहे, आणि तुम्ही PPF खाते तुमच्या मुलाच्या नावाने 15 वर्षांसाठी उघडले असेल, तर तुमचे मूल 22 वर्षांचे झाल्यावर त्याला एक मोठी रक्कम परतावा म्हणून मिळेल, जी त्याच्या शिक्षणासाठी किंवा रोजगारासाठी वापरता येऊ शकते.

PPF मिळणारा व्याज परतावा :
PPF योजनेत गुंतवणूक केल्यास 7.1 टक्के दराने चक्रवाढ व्याज पद्धतीने व्याज परतावा दिला जातो. जर तुम्ही तुमचे मूल लहान असताना गुंतवणूक सुरू केली तर, दीर्घकाळात तुमच्या कडे एक मोठी रक्कम तयार होईल, जीचा वापर तुम्ही मुलाच्या करिअरसाठी करू शकता. या योजनेत चांगली रक्कम गुंतवणूक केल्यास इतका परतावा मिळेल की, तुम्ही तुमच्या मुलांना परदेशात ही अभ्यासासाठी पाठवू शकता. या योजनेची विशेष गोष्ट म्हणजे या योजनेतील गुंतवणूक सुरक्षित असते, आणि त्यावर भारत सरकार हमी देते. सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास 7.1 टक्के दराने चक्रवाढ व्याज परतावा मिळतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PPF scheme Investment Return benefits in long term period on 10 November 2022.

हॅशटॅग्स

#PPF Scheme(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x