25 April 2024 5:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

Investment Tips | अप्रतिम योजना आणि त्याचे फायदे, फक्त 4 वर्ष प्रीमियम भरून 1 कोटी परतावा मिळवा, सविस्तर वाचा

Investment Tips

Investment Tips | आजकाल सर्वांना चांगले आयुष्य जगायचे आहे, आणि आपले सर्व गरजा पूर्ण करायचे आहेत. तथापि, असे दर्जेदार जीवनमान जगणे सहसा खूप खर्चिक मानले जाते. यासाठी काळजीपूर्वक आर्थिक नियोजन करणे आणि पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक असते. आर्थिक समतोल राखणे ही काळाची गरज बनली आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस नफा कमावण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र शेअर बाजारात खूप जोखीम असते. जर तुम्हाला तुमचा पैसा सुरक्षित आणि जास्त परतावा देणाऱ्या ठिकाणी गुंतवणूक करायचा असेल तर, LIC ची ‘जीवन शिरोमणी योजना’ हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्ही या योजनेत नियमित गुंतवणूक केली तर तुम्हाला योजनेतून कमालीचा फायदा होऊ शकतो. LIC ची ‘जीवन शिरोमणी योजना’ आपल्या ठेवीदारांना गुंतवणुकीवर संरक्षण आणि बचत असे दोन्ही लाभ देते.

LIC जीवन शिरोमणी योजना ही एक नॉन-लिंक्ड गुंतवणूक योजना आहे याचा अर्थ असा की ही योजना शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन नाही. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला किमान 1 कोटी रुपयांची जीवन सुरक्षा हमी दिली जाते. या योजने अंतर्गत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 1 कोटी रुपये किमान परतावा मिळू शकतो. या योजनेत तुम्ही 14 वर्षांच्या काळासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला किमान 1 कोटी रुपयांपर्यंतचा परतावा मिळू शकतो.

LIC जीवन शिरोमणी योजना क्रमांक 847 :
LIC द्वारे जीवन शिरोमणी योजनेची सुरुवात 19 डिसेंबर 2017 रोजी करण्यात आली होती. LIC द्वारे ही जीवन विमा पॉलिसी उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींना लक्षात घेऊन तयार करण्यात आली होती. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला गंभीर आजाराच्या बाबतीतही संरक्षण मिळते. जीवन शिरोमणी योजना पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि इतर सर्व परताव्याचे लाभ देते. पॉलिसीधारकाला अडचणीच्या वेळी पैसे हवे असल्यास ही योजना पॉलिसी धारकाला पैसे काढण्याचा पर्यायही प्रदान करते. याव्यतिरिक्त, योजनेच्या परिपक्वतेवर पॉलिसी धारकाला एकरकमी परतावा दिला जातो.

पॉलिसीचे लाभ :
* 14 वर्ष कालावधीसाठी पॉलिसी : 10 व्या आणि 12 व्या वर्षी विम्याच्या रकमेच्या 30-30 टक्के परतावा
* 16 वर्ष कालावधीसाठी पॉलिसी : 12 व्या आणि 14 व्या वर्षी विम्याच्या रकमेच्या 35-35 टक्के परतावा
* 18 वर्ष कालावधीसाठी पॉलिसी : 14 व्या आणि 16 व्या वर्षी विमा रकमेच्या 40-40 टक्के परतावा
* 20 वर्षांची पॉलिसी : 16 व्या आणि 18 व्या वर्षी विमा रकमेच्या 45-45 टक्के परतावा मिळतो.

योजनेतील इतर बाबी :
* किमान विमा रक्कम : 1 कोटी
* कमाल विमा रक्कम : कोणतीही मर्यादा नाही (मूलभूत विमा रक्कम 5 लाखांच्या पटीत असेल.)
* पॉलिसीचा कालावधी : 14, 16, 18 आणि 20 वर्षे
* नियमित भरावयाचा प्रीमियम कालावधी : 4 वर्षे

गुंतवणूकीची वय मर्यादा :
* पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्या लागणारी किमान वय मर्यादा : 18 वर्षे
* कमाल वय मर्यादा : 14 वर्षांच्या पॉलिसीसाठी 55 वर्षे
* 16 वर्षांच्या पॉलिसीसाठी कमाल वय : 51 वर्षे.
* 18 वर्षांच्या पॉलिसीसाठी कमाल वय : 48 वर्षे.
* 20 वर्षांच्या पॉलिसीसाठी कमाल वय : 45 वर्षे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment Tips in LIC Jeevan Shiromani Yojana for life insurance cover on 11 November 2022.

हॅशटॅग्स

#Investment Tips(142)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x