23 April 2024 8:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

Numerology Horoscope | 12 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1-
आज तुमचा दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. वाद-विवादांपासून दूर राहा. निरुपयोगी कामांमध्ये वेळ वाया घालवू नका. राग टाळा. भविष्याबद्दल मनात चिंता राहील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. परिवाराचे सहकार्य मिळेल. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 2-
आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. कार्यक्षेत्रात व व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतील. कार्यक्षमता वाढेल. सर्जनशील कार्यात रुची वाढेल. नव्या कल्पना मनात येतील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. आपली कार्यक्षमता वाढेल. परिवाराचे सहकार्य मिळेल. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 3-
आज तुमचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. तुम्ही सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असाल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 4-
आज तुमचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांच्या मदतीने कठीण कामेही केली जातील. अधिकाऱ्यांचा सहवास मिळणार . कोणत्याही कामात घाई करू नका. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबात काही शुभवार्ता मिळू शकतील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. घशाचे आजार त्रासदायक ठरू शकतात.

मूलांक 5-
आज कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. मानसिक त्रास होऊ शकतो. विरोधकांपासून सावध राहा. व्यवसायात नुकसान होऊ शकते. परिवाराचे सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांची भेट संभवते. धार्मिक कार्यात रुची वाढेल. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक ६-
आज आपला दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. मन अस्वस्थ राहील. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. विरोधक सक्रिय होऊ शकतात. वाद-विवादांपासून दूर राहा. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. धोकादायक प्रकरणांतील निर्णय सध्या तरी पुढे ढकला. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो.

मूलांक ७-
आज नोकरीधंद्यातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. क्षेत्रात आणि व्यवसायात अधिक मेहनत घ्यावी लागेल. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटता येईल. क्षेत्र आणि व्यवसायात नातेसंबंधांचा लाभ मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आपली कार्यक्षमता वाढेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण व्हाल. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 8-
आज तुमचा दिवस व्यस्त राहू शकतो. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. कामाचा अतिरेक होईल. आपली कार्यक्षमता वाढेल. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी येऊ शकतात. खर्चाचा अतिरेक होईल. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक ९-
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील परंतु व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. मनात विविध प्रकारचे विचार येतील. मानसिक विवंचनेपासून दूर राहा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 12 November 2022.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x