16 April 2024 12:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची ट्रेडिंग रेंज 20-30 रुपये मध्ये अडकली, सकारात्मक बातमीनंतर तज्ज्ञांनी काय म्हटलं? IREDA Share Price | IREDA शेअर्स 30 टक्क्यांची उसळी घेणार? तज्ज्ञांनी जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस Vodafone Idea Share Price | एका वर्षात 113% परतावा देणारा 12 रुपयाचा शेअर कोसळणार? तज्ज्ञांचा इशारा काय? Adani Power Share Price | अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा दबावाखाली? शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, हे टॉप 3 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढेल Suzlon Share Price | 1 वर्षात 416% परतावा देणारा शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Quant Mutual Fund | पगारदारांनो! महिना 1100 रुपयांची SIP बचत देईल 20 लाख रुपये, खास योजना सेव्ह करा
x

Penny Stock | बाब्बो! स्टॉक मार्केट का छोटा रिचार्ज, 1 रुपया 79 पैशाच्या शेअरने 5000 टक्के परतावा दिला, स्टॉक नेम नोट करा

Penny Stock

Penny Stock | मल्टीबॅगर कंपनी प्रिसिजन वायर्स इंडियाने आपल्या गुंतवणूकदारांना मोठी भेट देण्याचे जाहीर केले आहे. ही कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. म्हणजेच, ही कंपनी प्रत्येक 2 विद्यमान शेअर्ससाठी 1 बोनस शेअर फ्री वाटप करणार आहे. प्रिसिजन वायर्स इंडिया ही कंपनी दक्षिण आशियातील आणि भारतातली विंडिंग वायर्सची निर्मिती करणारी सर्वात मोठी उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीची स्थापित उत्पादन क्षमता वार्षिक 4000MT पेक्षा जास्त आहे. या कंपनीच्या शेअर्सनी मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 5000 टक्के पेक्षा अधिक रिटर्न्स दिले आहेत.

कंपनीचे शेअर्सवर मिळालेला परतावा :
13 नोव्हेंबर 2002 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE निर्देशांकावर प्रेसिजन वायर्स इंडियाचे शेअर्स 1.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 10 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 98.55 रुपयांवर ट्रेड करत होते. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 5300 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 13 नोव्हेंबर 2002 रोजी प्रिसिजन वायर्स इंडियाच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि ही गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 55.05 लाख रुपये झाले असते.

कंपनीचा व्यापार आणि नफा :
सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत प्रिसिजन वायर्स इंडिया कंपनीची निव्वळ विक्री 721.31 कोटी रुपये पर्यंत गेलो होती, ज्यामुळे कंपनीने सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत 14 कोटी पेक्षा जास्त नफा कमावला होता. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने 706.64 कोटी रुपयेची निव्वळ विक्री केली होती. जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत कंपनीचा करपूर्व नफा म्हणजेच प्रॉफिट बिफोर टॅक्स 19.60 कोटी रुपये संकलित झाला होता. एक वर्षापूर्वी प्रिसिजन वायर्स इंडिया कंपनीचा PBT याच तिमाही कालावधीत 20.73 कोटी रुपये संकलित झाला होता. 2022-2023 या चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीने 14.66 कोटी रुपयांचा निव्वळ नफा संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 14.97 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of Precision Wires India share price return on investment on 12 November 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x