29 March 2024 7:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

Kaynes Technology IPO | केन्स टेक्नॉलॉजीचा आयपीओ फॉर्मात, किती सबस्क्राइब आणि किती GMP चेक करा

Kaynes Technology IPO

Kaynes Technology IPO | आतापर्यंत Kaynes Technology इंडिया कंपनीच्या IPO चे 34.16 पट अधिक सबस्क्रिप्शन झाले आहे. NSE निर्देशांकावर उपलब्ध डेटानुसार, या कंपनीच्या IPO ला जारी करण्यात आलेल्या 1.04 कोटी शेअर्सच्या तुलनेत 35.76 कोटी शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली आहे. या IPO अंतर्गत, पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 98.47 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 21.21 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 4.09 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.

IPO चा तपशील थोडक्यात :
या IPO च्या माध्यमातून Kaynes Technology कंपनी 857.82 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. या IPO साठी Kaynes Technology कंपनीने प्रति शेअर किंमत बँड 559-587 रुपये जाहीर केली आहे. IPO मध्ये, 530 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स इश्यू केले जातील, आणि ऑफर फॉर सेल अंतर्गत 55,84,664 इक्विटी शेअर्स खुल्या बाजरी विक्रीसाठी जारी केले जातील. या कंपनीने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये माहिती दिली आहे की, IPO च्या माध्यमातून कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 257 कोटी रुपये जमा केले आहेत.

IPO मधील पैसचा वापर :
Kaynes Technology कंपनी या IPO मधून जमा होणारी रक्कम कंपनीवरील कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरणार आहे, आणि सोबत काही कॉर्पोरेट गरजांसाठी लागणारे खर्च भगवण्यातही यां पैशाचा वापर केला जाईल. याशिवाय काही पैशाचा वापर उत्पादन प्रकल्पाच्या विकासासाठी केला जाईल. या IPO साठी IIFL सिक्युरिटीज आणि DAM कॅपिटल अॅडव्हायझर्स यांना बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

उद्योग आणि व्यापार :
म्हैसूरस्थित Kaynes Technology कंपनी भारतातील एक अग्रगण्य एंड-टू-एंड आणि IoT/इंटरनेट ऑफ थिंग्ज सोल्यूशन प्रदान करणारी इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. या कंपनीचा मुख्य व्यवसाय इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम डिझाइन आणि उत्पादन सेवांशी संबंधित आहे. Kaynes Technology कंपनी मुळात कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथे स्थित आहे. या कंपनीचे पूर्ण भारतात विविध राज्यात एकूण 8 प्लांट आहेत. हे सर्व प्लांट कर्नाटक, हरियाणा, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, या राज्यामध्ये कार्यरत आहेत. ही कंपनी इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली आणि डिझाइन उत्पादन सेवा क्षेत्रामध्ये उद्योग व्यवसाय करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Kaynes Technology IPO is ready to launch soon, details has disclosed before IPO opening on 15 November 2022.

हॅशटॅग्स

#Kaynes Technology IPO(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x