24 April 2024 8:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

राजकीय फिल्डिंग! आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक आणि आदित्य ठाकरेंचा एकदिवसीय बिहार दौरा चर्चेत, हे आहे कारण?

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray | युवा नेते आदित्य ठाकरे महाराष्ट्राबाहेर म्हणजे बिहारच्या १ दिवसीय दौऱ्यावर चालले आहेत. आदित्य ठाकरे हे आज बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. बिहार दौऱ्यात आदित्य आरजेडी नेते तेजस्वी यादव यांना भेटणार आहेत, त्यामुळे आदित्य ठाकरे नेमके का आरजेडी नेते तेजस्वी यादव यांना भेटणार आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहेत. बिहारचे तरुण नेते तेजस्वी यादव हे बिहारी तरुणाचे आयकॉन झाले आहेत, तसेच लालू प्रसाद यादव यांचे पुत्र असल्याने त्यांच्या भोवती बिहारी लोकांमध्ये विशेष नातं आहे.

तेजस्वी यादव हे बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत. तेजस्वी यादव यांनी स्वबळावर बिहारमध्ये आरजेडीचे सर्वाधिक आमदार निवडून आणले. बिहारच्या जनतेमध्ये तेजस्वी यादव यांनी त्यांचा करिश्मा दाखवून दिला, त्यासंदर्भातच ही भेट होत असल्याचं सांगितलं जातं असलं तरी त्याला प्रमुख कारण आगामी मुंबई महानगरपालिका असल्याचं वृत्त आहे. मुंबई, ठाणे पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर बिहारचे लोक वास्तव्यास आहेत. या मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही भेट घेतली जातं असल्याचं कळतंय. शिवसेना, आरजेडी आणि जेडीयू यांची जवळीक इथल्या मतदारांना उद्धव ठाकरेंकडे आकर्षित करेल असं शिवसेनेतील नेत्यांनी म्हटलं आहे. भाजपाला अडचण अशी आहे हे बिहार स्थित असा कोणताही नेता नाही जो भाजपाला मुंबई-ठाण्यात मदत करेल आणि तेच शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पत्थ्यावर पडू शकतं असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

या दौऱ्यात शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई तसंच शिवसेना उपनेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि इतर काही प्रमुख पदाधिकारीही आदित्य ठाकरे यांच्यासोबत उपस्थित असणार आहेत.

आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही हजेरी लावली होती. देशातील हुकूमशाही राजवटीविरोधात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याची भूमिका तेव्हा आदित्य यांनी मांडली होती. आता ते बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचीही भेट घेणार असल्याने भविष्यात राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची एकजूट दिसणार का, अशी चर्चा आता सुरू झाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Aaditya Thackeray will meet Bihar DCM Tejasvi Yadav in Patna check details on 23 November 2022.

हॅशटॅग्स

#Aaditya Thackeray(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x