25 April 2024 11:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी?
x

Penny Stock | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा छोटा रिचार्ज शेअर, 10000 रुपयाच्या गुंतवणुकीवर 20 लाख परतावा देतोय

Penny Stock

Penny Stock | टाटा समूहातील एक स्टॉक 10760 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. मात्र आता हा शेअर मागील 6 महिन्यांत जवळपास 20 टक्क्यांनी पडला आहे. टाटा समूहातील या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 5263.40 रुपये होती. पण आता हा स्टॉक 6850 रुपयांवर ट्रेड करत आहे. सध्याचे स्टॉकचे प्रदर्शन पाहिले तर हा लवकरच आपली नीचांकी किंमत पातळी स्पर्श करेल असे चित्र दिसत आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत त्याचे नाव “Tata Elexi” असे आहे. चला तर मग Tata Elexi कंपनीच्या शेअरचा इतिहास जाणून घेऊ.

टाटा एलेक्सी लिमिटेड :
ही कंपनी आयटी क्षेत्रात उद्योग करते. 1 जानेवारी 1999 रोजी टाटा एल्क्सी लिमिटेड कंपनीचे शेअर फक्त 35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 14 वर्षांत शेअर फक्त 100 रुपयांपर्यंत वाढला होता. नोव्हेंबर 2013 पासून या कंपनीच्या शेअरने जी तेजी पकडली की स्टॉक परत थांबलाच नाही. 24 ऑगस्ट 2018 रोजी या कंपनीच्या शेअर ने 1400 रुपयेचा पल्ला गाठला. त्यानंतर शेअर पडायला सुरुवात झाली आणि 20 मार्च 2020 रोजी शेअर 598.60 रुपयांवर आला होता. नंतर टाटा अलेक्सी कंपनीच्या शेअरने पुन्हा एकदा तेजी पकडली आणि ऑगस्ट 2022 मध्ये स्टॉकने 10760 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली.

10000 गुंतवणुकीवर 20 लाख परतावा :
लोकांच्या 10,000 रुपये गुंतवणुकीचे 20 लाखात रूपांतर करणाऱ्या Tata Elexi या कंपनीच्या शेअरने आतापर्यंत सरासरी वार्षिक 16 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. मागील सहा महिन्यांत असे काही तरी घडले ज्याने या कंपनीच्या शेअर्सचे ग्रह तारे सर्व उलथापालथ झाले. मागील 6 महिन्यापासून हा स्टॉक 20 टक्के पडला आहे. मागील एका महिन्यात हा स्टॉक 6 टक्क्यानी पडला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी ज्या व्यक्तीने 10000 रुपयेची गुंतवणूक केली होती,त्याला आता 20 लाख रुपये परतावा मिळाला असणार.

Tata Elexi खरेदी विक्री :
Tata Elexi कंपनीच्या शेअर वर तज्ञ अजिबात उत्साही नाही. त्यांनी हा स्टॉक आणखी पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. एकूण सातपैकी 4 विश्लेषक हा स्टॉक विकून बाहेर पडण्याचा सल्ला देत आहेत. दोन तज्ञ स्टॉकमध्ये 6150 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याची शिफारस करत आहेत. आणि फक्त एका तज्ञ असा आहे ज्याने स्टॉक पडल्यावर आणखी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of Tata Elexi share price return on investment on 23 November 2022

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x