28 March 2024 2:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या Zomato Share Price | झोमॅटो शेअरने ब्रेकआऊट दिला, अल्पावधीत मोठी कमाई होणार, पुढील टार्गेट प्राइस जाणून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करणारा 42 रुपयाचा शेअर! 1 वर्षात 2400% परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर? IRFC Vs RVNL Share | या शेअरने 1 वर्षात दिला 297% परतावा, आता कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉकवर परिणाम होणार? Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअरवर परिणाम होणार? तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

Paytm Share Price | पेटीएम शेअर्सची घसरण थांबणार की सर्वकाही राम भरोसे? गुंतवणूकदारांचं नुकसान कधी थांबणार?

Paytm Share Price

Paytm Share Price | शेअर बाजारात सध्या सुरू असलेले पडझडीचे चक्र थांबायचे काही नाव घेत नाही. अनेक कंपन्यांचे शेअर्स सातत्याने घसरत चालेले आहेत. दरम्यान, पेटीएम कंपनीच्या शेअर्सचे निम्म्यापेक्षा अधिक पडले आहेत. Paytm कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा स्टॉक 450 रुपयांपर्यंत खाली आला होता. ही किंमत paytm स्टॉक ची आतापर्यंतची विक्रमी नीचांक किंमत पातळी आहे. शेअर बाजारात थोडीफार वाढ पाहायला मिळत आहे पण पेटीएमचे शेअर्स घसरत चालले आहेत. IPO आल्यापासून हा स्टॉक सातत्याने घसरत चालला आहे त्यामुळे शेअर धारकांना खूप मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

One 97 Communications Ltd कंपनी ही पेटीएमची मूळ कंपनी म्हणून ओळखली जाते. पेटीएम कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात सूचीबद्ध झाला तेव्हा लोकांना स्टॉकमध्ये तेजी येण्याची अपेक्षा होती, पण आता गुंतवणूकदारांची दिवसेंदिवस घोर निराशा होत आहे. Paytm चे शेअर्स दररोज एक नवीन नीचांक किंमत पातळी स्पर्श करत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स जवळपास 5 टक्क्यांचा कमजोरीसह 450 रुपयांवर ट्रेड करत होते. ही किंमत Paytm शेअरची आतापर्यंतची विक्रमी नीचांक किंमत पातळी आहे. Paytm शेअरमध्ये ज्या लोकांनी गुंतवणूक केली होती, ते आता स्टॉक मधून बाहेर पडत आहेत.

मागील एका महिन्यात Paytm कंपनीच्या शेअर्समध्ये 28 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली होती. तर या कालावधीत निफ्टी-50 निर्देशांकात 3 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. त्याच वेळी, Paytm कंपनीच्या शेअरमध्ये मागील 6 महिन्यांत 26 टक्क्यांची कमजोरी आली आहे. तर गेल्या वर्षभरात या कंपनीच्या शेअर्समध्ये 70 टक्क्यांपेक्षा अधिक पडले आहेत.

शेअर पडण्याचे कारण :
Paytm कंपनीचे शेअर्स सातत्याने पडण्याचे तात्कालिक कारण मुकेश अंबानी यांच्याशी संबंधित असल्याचे कळत आहे. खरं तर, मॅक्वेरी कॅपिटल ग्रुप लिमिटेड कंपनीच्या तज्ञांनी म्हंटले आहे की, भारतीय उद्योगपती आणि देशांतील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या Jio Finance Service चा व्यवसाय Paytm साठी खूप धोकादायक मानले जात आहे. म्हणून स्टॉक मध्ये सध्या घसरण दिसत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Paytm Share Price has fallen down after announcing Jio Finance service business soon to launch on 24 November 2022.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x