29 March 2024 7:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

SIP Calculator | म्युचुअल फंडाचा SIP फॉर्मुला माहिती असेल तर करोड मध्ये परतावा मिळेल, नोट करा आणि पैसा वाढवा

SIP Calculator

SIP Calculator | जर तुम्ही म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. तुम्ही म्युच्युअल फंडात दोन प्रकारे गुंतवणूक करू शकता. पाहिला प्रकार म्हणजे एकरकमी गुंतवणुक आणि दुसरा प्रकार म्हणजे एसआयपी गुंतवणूक. तथापि म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. शेअर बाजारात तेजी असली की म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना ही अप्रतिम परतावा मिळतो. अशावेळी जर म्युच्युअल फंड सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये 15 वर्ष कालावधीसाठी दरमहा 15,000 रुपये जमा केले तर तुम्ही दीर्घकाळात करोडपती होऊ शकता.

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारानी जास्तीत जास्त परतावा कमवण्यासाठी एक फॉर्मुला वापरणे खूप गरजेचे आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना 15x15x15 हा फॉर्म्युला वापरला तर तुम्ही करोडो रुपये परतावा कमवू शकता.

नियम काय सांगतो? :
15x15x15 या फॉर्मुला नुसार जर तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दीर्घ कालावधीसाठी 15000 रुपये गुंतवणूक केली आणि त्यावर तुम्हाला 15 टक्के वार्षिक या दराने परतावा मिळाल तर केवळ 15 वर्ष कालावधीत तुम्ही करोडपती होऊ शकता. म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटरनुसार एसआयपी गुंतवणूक करताना तुम्ही वार्षिक 15 टक्‍क्‍यांची वाढ करत राहिल्यास तुमची मॅच्युरिटी रक्कम 15 वर्षात दुप्पट होऊ शकते. 15 वर्षांत नियमित गुंतवणूक करून तुम्ही 2 कोटी रुपये परतावा सहज मिळवू शकता.

पूर्ण हिशोब समजून घ्या :
जर तुम्ही 15 वर्षांसाठी 15 हजार रुपये मासिक एसआयपी गुंतवणूक करत असाल तर तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक रक्कम 27 लाख रुपये जमा होईल. अशा परिस्थितीत जर तुम्हाला वार्षिक 15 टक्के दराने वार्षिक परतावा मिळाला तर तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 74,52,946 रुपये परतावा सहज मिळू शकतो. म्हणजेच तुमच्या २७ लाख रुपये गुंतवणुकीवर तुम्हाला 15 वर्षांनंतर 1,01,52,946 रुपये परतावा मिळेल. अशा प्रकारे हा फॉर्मुला वापरून तुम्ही 15 वर्षात दरमहा 15 हजार रुपये जमा करून 15 टक्के परतावा मिळवून करोडपती होऊ शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SIP Calculator for counting the Mutual fund SIP return on investment on 28 November 2022.

हॅशटॅग्स

#SIP Calculator(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x