19 April 2024 12:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर Reliance Power share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स पॉवर शेअर होल्ड करावा की बाहेर पडावे? Samvardhana Motherson Share Price | 18 पैशाच्या शेअरची जादू! गुंतवणुकदार झाले करोडपती, पुढेही फायद्याचा स्टॉक Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला Infosys Share Price | भरवशाचे टॉप 7 शेअर्स स्वस्त झाले, पण व्हॉल्यूम लाखोमध्ये, संयम राखल्यास मिळेल मल्टिबॅगर परतावा IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, सर्किट फिल्टरही वाढला, स्टॉक तुफान तेजीत येणार? Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, 1 वर्षात 412% परतावा देणारा 39 रुपयाचा शेअर तेजीत येणार?
x

Quick Money Share | गुंतवणुकीसाठी सरकारी योजना भारीच, पण सरकारी शेअर्स 'लय भारी', या स्टॉकने 1 दिवसात 20% परतावा

Quick Money Share

Quick Money Share| एकीकडे जगात आर्थिक मंदी येण्याचे संकेत मिळत आहेत, तर दुसरीकडे भारतीय शेअर बाजार सलग पाचव्या दिवशी तेजीत व्यवहार करत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी-50 निर्देशांक आपल्या नवीन विक्रमी पातळीवर व्यवहार करत आहेत. बाजारातील या तेजीचा जबरदस्त फायदा गुंतवणूकदारांना होत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. सरकारी मालकीची कंपनी MSTC ही अशाच कंपन्यापैकी एक आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सनी 20 टक्क्यांचा अप्पर सर्किट स्पर्श केला होता. बीएसई निर्देशांकावर MSTC कंपनीचे शेअर 338.80 रुपये किंमत पातळीवर व्यवहार करत होते. या कंपनीची स्थापना 1964 मध्ये झाली होती. ही कंपनी भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.

स्टॉकची कामगिरी : या वर्षी NSE निर्देशांकावर MSTC कंपनीचे शेअर्स 1.35 टक्के वाढले आहेत. एक वर्षापूर्वी ज्या लोकांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांनी आतापर्यंत फक्त 3.23 टक्के परतावा कमावला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 16.25 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. ज्या लोकांनी एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 25 टक्क्यांनी वाढले आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 388.20 रुपये आहे, तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 224.30 रुपये होती.

त्रैमासिक निकालाचे परिणाम : एप्रिल ते सप्टेंबर 2022 या तिमाहीत MSTC कंपनीचा PAT वार्षिक 90.7 टक्के वाढला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीने 117.96 कोटी रुपये नफा कमावला होता. या काळात मागील वर्षाच्या सहामाहीच्या तुलनेत कंपनीच्या महसुलात 7.6 टक्क्यांनी घट झाली आहे. सेवा वितरणाच्या बाबतीत ही कंपनी ई-कॉमर्स क्षेत्रात चांगले काम करत आहे. ही कंपनी आपल्या उद्योग क्षेत्रात आघाडीची कंपनी मानली जाते. MSTC केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सर्व विभागांना सेवा प्रदान करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| MSTC Limited share price Increasing Quickly in short term on 30 November 2022.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x